आज सफला एकादशी आहे.
आणि म्हणूनच आज एक वेगळी माहिती आपणां समोर ठेवत आहे.
ख्रिस्ती कालगणने प्रमाणेच हिंदू कालगणनेमध्येसुद्धा एका वर्षामध्ये बारा महिने असतात. तर दर तीन वर्षांतून एकदा अधिक महिना येतो.
या प्रत्येक महिन्यात तीस तिथी असून पंधरा तिथींचा एक पंधरवडा असे दोन पंधरवडे असतात. पहिल्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. तर दुसऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष अशी संज्ञा आहे.
प्रतिपदा ते पौर्णिमा अशी शुक्ल पक्षाची रचना असते तर प्रतिपदा ते अमावस्या अशी कृष्ण पक्षाची रचना असते.
एकादशी हा हिंदु पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पक्षांत प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात, तर संपूर्ण वर्षभरामध्ये २४ एकादश्या येतात. अधिक महिना असल्यास त्याच्या दोन एकादशींचा यात भर पडतो. या प्रत्येक एकादशीला स्वतंत्र असे नामकरण केलेले आहे.
हि नावे महिन्यानुसार पुढे दिली आहेत.
चैत्र - कामदा, वरूथिनी
वैशाख - मोहिनी, अपरा
ज्येष्ठ - निर्जला, योगिनी
आषाढ - शयनी, कामिका
श्रावण - पुत्रदा, अजा
भाद्रपद - परिवर्तिनी, इंदिरा
आश्विन - पाशांकुशा, रमा
कार्तिक - प्रबोधिनी, उत्पत्ती
मार्गशीर्ष - मोक्षदा, सफला
पौष - पुत्रदा, षट्तिला
माघ - जया, विजया
फाल्गुन - आमलकी, पापमोचनी
अधिक महिन्यातल्या दोनही एकादश्यांचे नाव ‘कमला‘ असते.
आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णु झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला चातुर्मास संपतो.....
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Comments