श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जाणा-या ५६ भोगाची माहिती.
देवाला ५६ प्रकारचे पक्वान्न वाढले जातात. त्यालाच छप्पन भोग असं म्हणतात. हे पक्वान्न रसगुल्ल्यापासून सुरू होतात त्यात दही, भात, पुरी, पापड असं सगळं असून ही सामग्री वेलचीवर संपते. अष्टोप्रहार भोजन करणा-या बालकृष्णाला अर्पण केल्या जाणा-या या ५६ भोगाच्या छान कथा आहेत.
दिवसाचे आठ प्रहर असतात. असं म्हटलं जातं की यशोदा बालकृष्णाला दिवसभरात आठ वेळ जेवायला वाढायची. इंद्राच्या प्रकोपामुळे लोकांना वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता तेव्हा जवळपास ७ दिवस अन्न आणि पाणी ग्रहण केलं नव्हतं. आठव्या दिवशी कृष्णाने इंद्राचा प्रकोप कमी झालेला पाहिला, पाऊस थांबला तेव्हा त्याने गाववाल्यांना घरी जायला सांगितलं.
मात्र कृष्णाने सात दिवस काहीच खाल्लेलं नाही याचं तिथल्या गावकऱ्यांना, यशोदेला अतिशय दु:ख झालं. म्हणूनच कृष्णाप्रती आपली भक्ती म्हणून गावकरी आणि यशोदेने ७ दिवस आणि ८ प्रहर (वेळा) असे ७ ७ ८ = ५६ इतके पदार्थ करून कृष्णासमोर ठेवले. श्रीमद् भगवदनुसार गोपिकांनी श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून एक महिना यमुना नदीत स्नान केलं आणि कालीमातेची प्रार्थनाही केली.
कृष्णानेही त्यांना तशीच संमती दिली. त्यांच्या व्रताची समाप्ती झाल्यावर गोपिकांनी आनंदाने कृष्णासाठी छप्पन भोग दिले. हे छप्पन भोग म्हणजे त्याच्या ५६ मैत्रिणी होत्या. असंही म्हटलं जातं की त्या काळात कृष्ण राधासंगे एक मोठया कमळावर बसायचे. त्या कमळाला तीन भाग होते.
एका भागात आठ, दुस-या भागात सोळा आणि तिस-या भागात बत्तीस पाकळ्या होत्या. प्रत्येक पाकळीवर एक प्रमुख सखी आणि मध्यभागी श्रीकृष्ण स्वत: विराजमान होत असत. याप्रमाणे पूर्ण पाकळ्यांची संख्या छप्पन होत असे. असाच याचा अर्थ सांगितला जातो. हे छप्पन भोग पुढीलप्रमाणे आहेत.:-
» भक्त (भात),
» सूप (डाळ),
» प्रलेह (चटणी),
» सदिका (कढी),
» दधिशाकजा (दही-ताकाची कढी),
» सिखरिणी (शिखरण),
» अवलेह (सरबत),
» बालका (बाटी),
» इक्षू खेरिणी (मुरंबा),
» त्रिकोण (शर्करायुक्त),
» बटक (वडा),
» मधू शीर्षक (मठरी),
» फेणिका (फेणी),
» परिष्ट (पुरी),
» शतपत्र (खजला),
» सधिद्रक (घेवर),
» चक्राम (मालपुआ),
» चिल्डिका (चोला),
» सुधाकुंडलिका (जिलेबी),
» धृतपूर (मेसू),
» वायुपूर (रसगुल्ला),
» चन्द्रकला (पगी हुई),
» दधि (महारायता),
» स्थूली (थुली),
» कर्पूरनाडी (लौंगपुरी- लवंगलतिका),
» खंड मंडल (खुरमा),
» गोधूम (दलिया),
» परिखा,
» सुफलाढया (सौंफयुक्त),
» दधिरूप (बिलसारू),
» मोदक (लड्ड),
» शाक (साग),
» सौधान (अधानौ अचार),
» मंडका (मोठ),
» पायस (खीर)
» दधि (दही),
» गोघृत,
» हैयंगपीनम (मक्खन),
» मंडुरी (मलाई),
» कूपिका (रबडी),
» पर्पट (पापड),
» शक्तिका (सीरा),
» लसिका (लस्सी),
» सुवत,
» संघाय (मोहन),
» सुफला (सुपारी),
» सीता (वेलची),
» फल,
» तांबूल,
» मोहन भोग,
» लवण,(मीठ)
» कषाय,
» मधुर,
» तिक्त,
» कटू,
» अम्ल
Comments