top of page
  • श्री विनोद पंचभाई

दिवाळीच्या दिवसांत ही सात काम करु नये...

शास्त्रात सांगितले की, दिवाळीच्या दिवसांत ही सात काम करु नये...

दिवाळीच्या दिवसांत देवी लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी किती तरी प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय केले जातात, पूजा केली जाते. पण हे सर्व सावधन पणे करायला हवं.

शास्त्रात सांगितले आहे की, दिवाळीच्या दिवसांत कुठची काम नाही केली पाहिजेत. जी काम नाही करायची ती जर केली तर लक्ष्मी प्रप्तीसाठी मग कितीही उपाय केले तरी लक्ष्मी प्राप्त करता येत नाही. जाणुन घेऊया दिवाळीत कोणती काम करु नयेत....


♦️सकाळी उशिरापर्यंत झोपुन राहु नये....

तसं तर रोजच सकाळी लवकर उठलं पाहिजे. परंतु कितीतरी लोक सकाळी उशिरा उठतात. शास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर उठावे. जे लोक या दिवशी सूर्योदयानंतर झोपून राहतात, त्यांना महालक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही.....

♦️आई वडिल तसेच वडिलधाऱ्या व्यक्तिंचा अपमान करू नये....

दिवाळी च्या दिवशी विशेष लक्ष दिले पाहिजे की, कोणत्याही परिस्थितीत कोणतंही अधार्मिक काम करू नये. जे आपल्या आई वडिल किंवा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तिंना अपमानित करतात, त्यांच्या वर देवदेवतांची कृपा होत नाही. त्यांच्याकडे दरिद्रता रहाते. कुणालाही धोका देऊ नये, खोटं बोलु नये, सर्वांशी प्रेमाने वागावे.


♦️ घरात घाण ठेऊ नये :-

दिवाळीत घरात घाण ठेऊ नये. घर स्वच्छ ठेवावे. घराचा कोपरा न कोपरा साफ ठेवावा.‌ घरात घाणेरडा वास नसावा. घरात साफसफाई करून घर सुगंधित ठेवावे. सुगंधित पदार्थांचा उपयोग करावा.

♦️ रागीटपणा असु नये :-

दिवाळी मध्ये रागाला थारा देऊ नये. घरात जोरजोरात आरडा ओरडा करु नये, ते अशुभ असते. जे या दिवसात रागावर नियंत्रण ठेवु शकत नाहीत, त्यांच्या घरात लक्ष्मीची कृपा होत नाही. घरात नेहेमी शांतीपूर्ण, सुखी, पवित्र वातावरण जरुर असावे, लक्ष्मी अशाच घरात राहते....

♦️ संध्याकाळी झोपु नये :-

काही खास कारणांमुळे झोपण आवश्यक असते ते सोडून दिवसा वा रात्री झोपू नये.‌जर कोणी आजारी असेल, वयस्कर व्यक्ती असेल, गरोदर स्री असेल,तर ते दिवसा वा संध्याकाळी झोपू शकतात परंतु सामान्य स्वस्थ व्यक्तिने झोपु नये. ....

♦️ वादविवाद करु नये. :-

दिवाळी च्या दिवशी हे लक्षात असु द्या कि, घरात कुठल्याही कारणांमुळे भांडण, वादविवाद करु नये.घरातील सर्वांनी आपापसात प्रेमळ संबंध ठेवावेत,आनंदाचे वातावरण असू द्यावे.ज्या घरात वादविवाद, भांडण असतात तीथ लक्ष्मि ची कृपा रहात नाही.‌घरात नाही तसंच बाहेर सुध्दा कोणाबरोबर ही वादविवाद,भांडण करु नये.....


♦️ नशा करू नये :-

शास्त्रात नमूद केल्याप्रमाणे या दिवसात च असं नसून कधीही कोणतीही नशा करू नये.‌जी लोक अशा आनंदाच्या पवित्र सणात नशा करतात ते कायम दारिद्यात असतात. नशीला माणुस घरची परिस्थिती गंभीर बनवतो.त्याच्या व्यसनामुळे घरातील सर्व मानसिक ताण तणावात राहतात.‌त्यासाठी व्यसन करु नये, कोणाबरोबर वादविवाद,भांडण उकरुन काढू नये,व्यसनाधिन व्यक्ति कडे लक्ष्मी कधीही टिकत नाही....

16 views0 comments

Comments


bottom of page