अपरा एकादशीचे पूजन
- श्री विनोद पंचभाई
- Jun 6, 2021
- 1 min read
अपरा एकदशीचे व्रत आचरणाऱ्यांनी पहाटे नियमित जीवनकर्म आटपल्यानंतर श्रीविष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंचे आवाहन करून त्यांची स्थापना करावी. श्रीविष्णूंना पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे अर्पण करावीत. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.

-----------------------------------------
अपरा एकादशीच्या व्रताचा विधी
----------------------------------------
अपरा एकादशी व्रताचा विधी पुढीलप्रमाणे आहे..
अपरा एकादशीच्या दिवशी स्नान करून पवित्र झाल्यानंतर संकल्प करून भगवान श्रीविष्णूचे पूजन करावे.
श्रीहरिला फुल,फळ,तीळ,दुध,पंचामृत इ.पदार्थ अर्पण करावेत.
दिवसभर उपवास करावा.एकादशी व्रतामध्ये ब्राह्मणाला भोजन आणि दक्षिणा देण्याचे विशेष महत्त्व आहे.
अशाप्रकारे अपरा एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
अपरा एकादशी व्रत करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
१.पूजेमध्ये अक्षता ऐवजी तीळ अर्पण करावेत
२.आळस करू नये
३.श्रीहरीचे नामस्मरण करावे.
४.तुळशीचे पान टाकून देवाला नैवेद्य दाखवावा.
५.रात्री जागरण करावे
६.ब्रह्मचर्यचे पालन करावे.
Comments