वैशाख मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात.
एकादशी भगवान विष्णूंची जन्म तिथी आहे.
येथे जाणून घ्या, या दिवशी करण्यात येणारे काही खास उपाय.
१. गायीचे कच्चे दूध (गरम न केलेले)घेऊन त्यामध्ये केशर टाकून भगवान विष्णूंचा अभिषेक करावा.
२. एकादशीला भगवान विष्णू यांना खीर किंवा पिवळे फळ, मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
३. तुम्हाला धनलाभाची इच्छा असल्यास एकादशीला भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची पूजा करावी.
४. एकादशीला दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल भरून भगवान विष्णूंचा अभिषेक करावा.
५. एकादशीला संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि नमस्कार करावा.
६. पिंपळामध्ये भगवान विष्णूंचा वास मानण्यात आला आहे. यामुळे एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे.
७. भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन ध्यान दान करावे.
८. भगवान विष्णू यांना पितांबरधारी म्हणतात यामुळे एकादशीच्या दिवशी यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे.
९. एकादशीला भगवान विष्णू यांना तुळशीची माळ अर्पण करावी. यामुळे श्रीविष्णू प्रसन्न होतात.
१०. या दिवशी भगवान विष्णू यांना कमळाचे किंवा पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करणे शुभ राहते.
Comments