top of page
  • श्री विनोद पंचभाई

अशी साजरी करावी दिवाळी - भाग १

मित्रांनो गेले काही महिने आपण कोरोना महामारीच्या दुष्ट चक्रातून जात असताना दीपावलीचा सण जवळ आलेला आहे.!! या वर्षी दिवाळीत सर्वांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.! धुराचे प्रदूषण टाळून स्वतःचे व आपल्या घरातील वृद्धांचे रक्षण करण्यासाठी तसेच श्वास ,दमा , फुफ्फुसाचे रोग असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही दिवाळी फटाके व्यतिरिक्त साजरी करावयाची आहे.!!असो,

आपण सर्वजण याचे गांभीर्य समजून आहातच!


■ महत्त्वाचे म्हणजे या कोरोनाच्या काळात आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या डाँक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी,सुरक्षा कर्मचारी पोलीस, समाजसेवक वगैरे सर्व शहीद कोरोना योद्ध्यांसाठी आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला पाच पणत्यात दिवे लावावे व त्यांच्यासाठी प्रार्थना करावी.!!■

Image by pradippal from Pixabay

यंदाची दिवाळी साजरी करताना कोणत्या दिवशी

काय करायचे ते पुढे सविस्तर देत आहे.!

🟣 वसुबारस 🟣

दि. 12-11-2020 रोजी गुरूवारी गुरुद्वादशी आहे. वसुबारस आहे. या दिवशी संध्याकाळी वासरासह गाईचे पूजन करावे.हळद कुंकु फूल तसेच उडदाच्या वड्याचा नैवेद्द दाखवावा. गाईला वडा व चारा खाऊ घालावा.! गाईला वासरासह नऊ प्रदक्षिणा घालाव्यात.! व जमल्यास खालील वेद मंत्राचे पठण करावे.!


●ओम् गौरिर्मिमाय सलिलानि तक्ष्यत्येकपदि द्विपदि सा चतुष्पदि अष्टापदि नवपदि बभूवुषि सहस्त्राक्षरा परमेव्योमन्।।● अथवा "सवत्स धेनुमातायै नमो नमः।। हा मंत्र म्हणावा.

या दिवशी गाईचे दूध पिऊ नये .व तळलेले पदार्थ आपण खाऊ नये.!!

💠 धनत्रयोदशी 💠

दि.13-11-2020 रोजी शुक्रवारी धनत्रयोदशी आहे.! या दिवशी संध्याकाळी कणकेचा दिवा घराच्या दक्षिणेस ज्योत करून लावावा.! व खालील मंत्राने दिव्याला नमस्कार करावा.!!


मृत्युनां पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह। त्

रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

🟪 नरक चतुर्दशी 🟪

दि. 14-11-2020 रोजी

नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकेच दिवशी आहे.!!

⚫ नरक चतुर्दशी ⚫

या दिवशी मृत्यूचा अधिपति यमराज यांचे पूजन व तर्पण करण्याचा संस्कार सध्याच्या काळात दुर्लक्षित केलेला दिसून येत आहे.!म्हणून याविषयी जास्त न लिहिता थोडक्यात माहिती देतो.!!

कोरोना महामारी च्या या काळात आपली काळजी घेताना दिवाळीच्या निमित्ताने बाजारात व जिकडे तिकडे गर्दी होताना दिसत आहे तेंव्हा जरूर ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.! याचप्रमाणे गजबजलेली शहरे, खराब झालेले रस्ते, अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती तसेच घात-अपघात अशा असंख्य कारणामुळे प्रत्येकाला अपःमृत्यूचे भय निर्माण झालेले आहे.!! जिवंत राहाण्याची शाश्वती राहिलेली नाही.!!!! यासाठी या नरक चतुर्दशीच्या या दिवशी आपण यमराजाचे पूजन व यमतर्पण करायचे आहे.!

ज्यांचे वडील जिवंत नाहीत त्यांनी केशरयुक्त गंध मिश्रित पाण्यात तीळ व तुलसीपत्र घालून.तसेच वडील जिवंत असणाऱ्याने तिळाच्या ऐवजी तांदूळ घालून हे पूजन करायचे आहे.---!


दक्षिणे कडे मुख करून आसनस्थ व्हावे. आपल्या समोर मोठे ताम्हण घेऊन पळी पंचपात्र तसेच वर सांगितल्याप्रमाणे तीळ अथवा तांदूळ मिश्रित पाण्याचे भांडे घेऊन बसल्यावर. सर्वात प्रथम आचमन, प्राणायाम करावा व पुढील संकल्प करावा.!

"मम आत्मनः सकुटुंबानां अपःमृत्यू परिहारार्थ यमदेवता प्रीत्यर्थ यथाज्ञानेन पूजनं अर्घ्यदानं तथा यमतर्पणं महं करिष्ये ।।"!!


यानंतर खालील महामृत्युंजयाचा जप ११ वेळेला करावा.!!


ओम् त्र्यंबकं यजामहे सुगंधिंपुष्टिवर्धनम्।

उर्वारुकमिव बंधनात्

मृत्योर्मुक्षियमामृतात्।।

वरील मंत्राचा ११ संखेत जप झाल्यावर उभा राहून यमदेवांना खालील प्रमाणे त्या पाण्याने अर्घ्यदान द्यावे.(प्रत्येक नावाने । इद्मर्घ्यम् दत्त नमम । म्हणत म्हणत समोरच्या भांड्यात थोडे थोडे पाणी हाताच्या ओंजळीतून सोडावे)

🎇🎇🎇🎇🎇🎇🎇

ओम् यमाय नमः। इदमर्घ्यं दत्त न मम।

ओम् धर्मराजाय नमः।

इदमर्घ्यं दत्त न मम।

ओम् मृत्युदेवाय नमः।

इदमर्घ्यं दत्त न मम।

ओम् अंतकाय नमः।

इदमर्घ्यं दत्त न मम।

ओम् वैवस्वताय नमः।

इदमर्घ्यं दत्त न मम।

ओम् कालाय नमः।

इदमर्घ्यं दत्त न मम।

ओम् सर्वभूतक्षयकराय नमः ।इदमर्घ्यं दत्त न मम।

ओम् औदुंबराय नमः।

इदमर्घ्यं दत्त न मम ।

ओम् दध्नाय नमः ।

इदमर्घ्यं दत्त न मम।

ओम् नीलाय नमः।

इदमर्घ्यं दत्त न मम।

ओम् परमेष्टिनं नमः।

इदमर्घ्यं दत्त न मम।

ओम् वृकोदराय नमः।

इदमर्घ्यं दत्त न मम ।

ओम् चित्राय नमः।

इदमर्घ्यं दत्त न मम।

ओम् चित्रगुप्ताय नमः।

इदमर्घ्यं दत्त न मम।

अशारीतीने अर्घ्यदान केल्यानंतर खाली बसावे व तिळमिश्रित/तांदुळमिश्रित पाण्याने समोरच्या ताम्हणात खालील प्रमाणे यमतर्पण करावे.!!(तर्पयामि असे म्हणताना पळीपळी पाणी उजव्या हातावरून तीनदा ताम्हणात सोडावे)

🎇🎇🎇🎇🎇🎇🎇

यमंतर्पयामि।।

धर्मराजंतर्पयामि।।

मृत्युंतर्पयामि।।

अंतकंतर्पयामि।।

वैवस्वतंतर्पयामि।।

कालंतर्पयामि।।

सर्वभूतक्षयकरंतर्पयामि।

औदुंबरंतर्पयामि।।

दध्नंतर्पयामि ।।

नीलंतर्पयामि।।

परमेष्ठिनंतर्पयामि।।

वृकोदरंतर्पयामि।।

चित्रंतर्पयामि।।

चित्रगुप्तंतर्पयामि।।

तर्पण झाल्यानंतर दक्षिणेकडे मुख करून पुढील श्लोक दहा वेळेस म्हणावा.!!

●यमोनिहंता पितृधर्मराजो

वैवस्वतो दंडधरश्च कालः।

भूताधिपो दत्त कृतानुसारी

कृतांत एतद्दशभिर्जपंति ।।●

अशारीतीने वर्षातून एकदा हे करण्याची सवय केल्यास पुढच्या पिढीला संस्कार कळतील. आपण हे जरूर कराल ! हीच अपेक्षा !!

अशाचप्रकारे यमतर्पण दि.

16-11-20 रोजी भाऊबीज

व पाडवा एकेच दिवशी आल्याने त्या दिवशी पण करावे.

11 views0 comments

Comentarios


bottom of page