साहित्य:
अर्धा किलो कारले
शेंगदाण्याचा कूट १/२ वाटी
काळा मसाला २ चमचे
लाल तिखट २ चमचे,
धने पूड १ चमचा
जीरे पूड १चमचा
तेल २ मोठे चमचे
खोबऱ्याची पूड २ चमचे
कांदे मोठे २
चिंचेचा कोळ २ चमचे
गूळ चवीनुसार
हिंग १/४ चमचा
मोहरी १/२ चमचा
हळद १/२ चमचा
मीठ चवीनुसार
कृती:
प्रथम कारले स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्यावेत.
नंतर त्याचे साधारण दोन इंचाचे काप करावेत व आतील बिया पूर्ण काढून टाकाव्यात.
कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
तो थंड झाल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट, काळा मसाला, तिखट, धने पूड, जिरे पूड, मीठ, खोबऱ्याची पूड, चिंचेचा कोळ, गूळ घालून ते मिश्रण छान एकजीव करून घ्यावे.
ते मिश्रण कारल्याच्या प्रत्येक फोडीत पूर्णपणे भरून घ्यावे.
त्याच कढईत १ मोठा चमचा तेल टाकून मोहरी व हिंगाची फोडणी करून घ्यावी.
त्यात भरलेले कारले टाकावेत व छान परतून घ्यावेत.
मिश्रण जर उरले असेल तर तेही भाजीसोबत कढईत परतून घ्यावे.
नुसत्या वाफेवर ही भाजी शिजवून घ्यावी म्हणचे अजिबात कडू होत नाही.
Comments