चकली भाजणी प्रमाण :
४ वाट्या तांदूळ
२ वाट्या हरभरा डाळ
१ वाटी पोहे
१ वाटी उडिद डाळ
कृती :
प्रथम तांदूळ, हरभरा डाळ आणि उडिद डाळ स्वच्छ धुऊन सुकवून घ्यावे. थोडेसे ओलसर असतानाच प्रत्येक जिन्नस गुलाबी रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्यावा . मिश्रण थंड झाल्यावर थोडेसे जाडसर दळून आणावे.
चकली साहित्य :
तेल ,तीळ ,मीठ ,हिंग ,ओवा, तिखट, हळद ,पाणी
चकली कृती :
चकली करताना पिठाच्या अर्ध्या प्रमाणात (म्हणजे २ वाट्या पीठ असेल तर १ वाटी पाणी) चांगले उकळून घ्यावे. पिठामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घालावे व पाण्यात तीळ , हिंग , मीठ, तिखट, हळद आणि ओवा घालून ते उकळलेले पाणी पिठात टाकावे व ५ मिनिटे ते पीठ झाकून ठेवावे. नंतर पीठ चांगले मळून घ्यावे आणि चकल्या कराव्यात. चकल्या तळताना तेल चांगले तापलेले असावे.
Comments