top of page
  • श्री विनोद पंचभाई

दीव्याची अमावस्या

मित्रांनो ! बंधूनो! भगिनिंनो!! आषाढ महिन्यात दि.08-08-2021 रोजी रविवारी दिवसभर व संध्याकाळी 07-20 पर्यंत अमावस्या तिथीची व्याप्ती आहे.! या अमावस्येला दिव्याची अमावस्या असेही म्हणतात !! त्याच कालावधीत चंद्र कर्केत असेल व त्याचवेळी रविही कर्क राशीत असेल! दोन्हीही ग्रह 3 अंशावर असतील.!!! या मुहूर्तावर दिव्यांची पूजा करावयाची असते!! कर्क राशीत चंद्र व सूर्य असतांना सर्वांनी ही पूजा केली असता खूप लाभ होतो.!!अनुभव घ्यावा.!!





ही पूजा करण्यापूर्वी आपल्या वास्तूतील सर्व कोपरे स्वच्छ करावे. सर्व केरकचरा एका पिशवीत भरावा.! कडुलिंबाचा एक फाटा घेऊन घरातील सर्व कोपऱ्यांवर जमीनीवर फिरवून!!तो फाटा व कचऱ्याची पिशवी आपल्या घरापासून दूर दक्षिण दिशेला खड्यात टाकावी.! किंवा जमल्यास नदीच्या तलावाच्या किंवा विहिरीच्या पाण्यात विसर्जन करावी.! हे करताना खालील मंत्र म्हणावा.!


"अपवित्रःपवित्रोवा । सर्वावस्था गतोपिवा । यस्मरेत् पुंडरिकाक्ष ।

सबाह्याभ्यंतरःशुचीः।।"


(आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती आपण विसर्जित करत आहोत ही भावना मात्र लक्षात घ्यावी.!)


घरातील सर्व जुने दिवे घासून चकचकीत करावे.! घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडावे. ! शुचिर्भूत होऊन पूर्वाभिमुख आपल्या समोर एका चौरंगावर तांदूळ पसरावे.!त्यावर ते दिवे लावावे.शक्य असतील तर मोठ्या दोन समया आपल्या उजव्या व डाव्या बाजूला चौरंगावर मांडून त्यात तेलवाती लावाव्यात.! व छोट्या छोट्या कणकीच्या दिव्यात तुपाचे दिवे लावावेत.! घरातील जेवढे मेंबर असतील तेवढे दिवे असावेत.! त्या चौरंगाखाली प्रत्येकानी आपल्या मनातील इच्छा एका चिठ्ठीवर लिहून ठेवावी.!!!


दिव्याची पूजा करताना प्रथम

दिवे सर्व लावावे.!! त्याची पंचोपचार पूजा करावी.!!गंध, अक्षत,हळद कुंकू फुले वाहून धूप दीप नैवेद्य दाखवावा. आणि पुढील प्रार्थना करावी---!!!


🔥भो दीप ब्रह्मस्वरूपम् ज्योतिषाम् प्रभुरव्याः ।

यावत् मम समस्या समाप्तिस्यात् तावत्वं सुस्थिरो भव।।🔥


🔶 हे ! दीपदेवता !! माझ्या मनातील त्रास व समस्या समाप्त होईपर्यंत तू ज्ञानाग्नीस्वरूपात माझ्या पठीशी स्थीरपणे राहून माझे रक्षण कर!!🔶


मोठ्या श्रद्धेने ही पूजा करावी.!!

याशिवाय कथा कहाण्यांना अनुसरून बऱ्याच माता भगिनी मातीच्या दिव्यात तेलवाती लावतात. !! कहाणीतील राजाच्या सुनेला हाकलून दिल्या नंतर तिने मातीच्या दिव्याची पूजा केली होती व बाभळीच्या झाडाखाली ती पूजा केली होती.! म्हणून बाभळीच्या पिवळ्या फुलाचे महत्त्व आहे.!आजही ही प्रथा खूप ठिकाणी चालू आहे.!!!!!

एकंदरीत पवित्र व दुःखाचा नाश करणाऱ्या अशा या आषाढी अमावस्येला आजच्या काळात दुर्लक्षित केले जाते.!! जागृती होणे आवश्यक आहे.! ही अमावस्या संपल्यानंतर पवित्र असा "श्रावण" महिना सुरू होतो आहे.!! आणि या श्रावण महिन्यात खूप काही उपासना साधना आपणास करावयाच्या आहेत.!!हे एक प्रकारचे मानसिक शुद्धीकरण आहे एवढेच लक्षात घ्यावे.!!!


[दुसरे दिवशी ही पूजा देवळात ठेवावी]

80 views0 comments

Comments


bottom of page