top of page
  • श्री विनोद पंचभाई

दीपावली दिनचर्या

1. बुधवार ११-११-२०२० रमा एकादशी - ब्रह्म मुहूर्तावर अंघोळ करुन लक्ष्मी - नारायणाची पुजा करा. शक्य असल्यास उपवास करा. गीतेचा २,१२,१५ पैकी एक अध्याय तरी वाचा.


2. गुरुवार १२-११-२०२० - गोरज मुहुर्तावर पशुधन संवर्धनाची मनोकामना करुन गायवासराची पुजा करा.

Image by bhupendra Singh from Pixabay

3. शुक्रवार १३-११-२०२० धनत्रयोदशी - सायंकाळी ६.२५ ते ६.४० या वेळेत कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करुन लावून ठेवा.


मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह।

त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम।।


हा श्लोक म्हणून दिव्याला नमस्कार करावा


4. शनिवार १४-११-२०२० नरक चतुर्दशी - पहाटे पिता असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व इतरांनी तीळ घालून सोबतच्या चौदा नावांनी यमतर्पण करावे.


यमंतर्पयामी, धर्मराजंतर्पयामी, मृत्युंतर्पयामी,

अंतकंतर्पयामी, वैवस्वतंतर्पयामी, कालंतर्पयामी,

सर्वभूतक्षयकरंतर्पयामी, औदुंबरंतर्पयामी,

दघ्नंतर्पयामी, नीलंतर्पयामी, परमेष्ठीनंतर्पयामी,

वृकरोदरंतर्पयामी, चित्रंतर्पयामी,चित्रगुप्तंतर्पयामी


तर्पणानंतर खालील श्लोक दक्षिणेकडे तोंड करुन १०८ वेळा म्हणावा. शक्य नसल्यास १० वेळा करा.


यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वत दंडधरश्च कालो।

भूताधिपो दत्त कृतानुसारी करतात एतद्दशभिर्जपंति


5. शनिवार १४-११-२०२० सायंकाळी ६ते रात्री.2:00 या वेळेत लक्ष्मीपूजन करावे.


6. सोमवार १६-११-२०२० बलिप्रतिपदा - पाटावर बलीची तांदुळाची प्रतिमा काढून त्याचे पूजन करावे ,अन्नाच्या(धान्य) ढीगावर गोपाळकृष्णाची प्रतिमा ठेऊन त्याचे पूजन करावे. वहीपूजन करावे. पत्नीने पतीस ओवाळून घसघशीत ओवाळणी घ्यावी.


यमद्वितीया भाऊबीज - बहिणीकडून ओवाळून घेऊन घसघशीत ओवाळणी घालावी.

नररकचतुर्दशीचा यमतर्पण विधी पुन्हा करावा


7. गुरुवार १९-११-२०२० पांडव पंचमी - पांडवपूजन करावे


8. सोमवार २३-११-२०२० कूष्मांड नवमी - कोहळ्याचे दान करावे


9. २६-११-२०२० ते ३०-११-२०२० - या काळात आपणास सोयिस्कर दिवशी तुलसी विवाह करावा. तुळसीपत्राने श्री विष्णुचे तर बिल्लपत्राने श्री शंकराचे पूजन करावे.


10. रविवार २९-११-२०२० त्रिपुरारी पौर्णिमा - दिव्यांची ( वाहत्या पाण्यात)आरास करुन

दिपोत्सावाची सांगता करावी.

8 views0 comments

Comments


bottom of page