top of page
  • श्री विनोद पंचभाई

कर्णवेध संस्कार (कान टोचणे)

आपल्या मुनींनी देखील सर्व संस्कार वैज्ञानिक कसोटींत खरे उतरल्या नंतरच त्यांचा प्रारंभ केला आहे. कर्णवेध संस्काराचा आधार पूर्णपणे वैज्ञानिक आहे. बाळाचे शारीरिक व्याधींपासून संरक्षण व्हावे हाच यामागचा हेतू आहे. प्रकृतीदत्त या शरीराची सर्व अंग महत्त्वपूर्ण आहेत. कान आपले श्रवण द्वार आहेत. कान टोचल्याने व्याधी दूर होतात तसेच ऐकण्याची शक्ती देखील वाढते. याच्या सोबतच कानांत दागिने घालणे हा आपल्या सौंदर्य दृष्टीचा परिचयच आहे.



nypost.com


प्रत्यक्षात आपल्याकडे बाळ अगदी लहान असतानाच त्याचे कान टोचून घेतले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्ल पक्षातील शुभ मुहूर्तावर या संस्काराचे संयोजन उत्तम आहे.


म्हणून लहान मुलांचे कान अवश्य टोचावेत_


जगभरामधील महिला, पुरुष, तरुण-तरुणी आपले कान टोचून घेत असतात, ते कानामध्ये निरनिराळ्या पद्धतीची आभूषणे घालण्याची हौस पूर्ण करण्यासाठी. पण भारतात मात्र कान टोचण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. आपल्याकडे मूल अगदी तान्हे असतानाच त्याचे कान टोचविण्याची पद्धत आहे. ही वेदिक परंपरा असून ह्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचे म्हटले जाते.


आपल्या कानाचे इयर लोब्स, म्हणजेच जिथे कान टोचले जातात त्या भागाच्या मधोमध असणारा बिंदू अतिशय महत्वाचा आहे.


हा पॉईंट आपल्या प्रजनन करणाऱ्या अवयवांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतो.


महिलांच्या मासिक धर्माची नियमितता देखील या बिंदूवर अवलंबून असते.


कान टोचल्याने एक प्रकारे अॅक्यू पंक्चर ही उपचारपद्धती अवलंबली जात असते.


कान टोचल्याने मेंदूचे डावे आणि उजवे भाग सक्रीय राहण्यास मदत होत असून, लहान मेंदूचा विकास होतो. त्यामुळे लहान वयामधेच मुलांचे कान टोचणे गरजेचे असते, कारण या वयातच मेंदूचा सर्वाधिक विकास होत असतो.


कान टोचल्याने सक्रीय झालेल्या बिन्दुमुळे मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.


तसेच त्यांची दृष्टी देखील सतेज राहण्यास मदत होते. दृष्टीबरोबर मुलांची श्रवण शक्ती देखील चांगली राहते.


जथे आपला कान टोचला जातो, त्या बिंदुला ‘ हंगर पॉईंट ‘ असे देखील म्हटले जाते. या बिंदुला सक्रीय केल्याने लहान मुलांची पचनशक्ती चांगली विकसित होते, व मुलांना चांगली भूकही लागते.


वजन कमी करण्यासाठी देखील हा बिंदू सक्रीय राहणे आवश्यक आहे.


कान टोचल्याने मेंदूची शक्ती वाढीला लागत असून, एकाग्रता वाढण्यास मदत होते.


जिथे कान टोचले गेले आहेत, त्या जागेच्या आसपासच्या बिंदूंना हाताने दाबून त्यांच्यावर प्रेशर दिल्याने मानसिक तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते.





कान टोचणे विधी


आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कान टोचण्याची परंपरा आहे. मूल जन्मल्यानंतर त्याचे कान टोचले जातात. परंतु आजकाल याकडे फॅशन म्हणून पाहिले जाते. हल्लीची तरुण मुलेही फॅशन म्हणून कान टोचतात. परंतु याचेही अनेक फायदे आहेत. ते पुढीलप्रमाणे...


मेंदुचा विकास - कानाच्या खालील भागात एक पॉइंट असतो. जो मस्तिष्काच्या डाव्या आणि उजव्या गोलार्ध्दला जोडला जातो. याच्या मध्यभागी जेव्हा प्रेशर दिले जाते. तेव्हा यामधील सर्व रक्तवाहिन्या सक्रिय होतात. यामुळे लहान मुलांचे कान टोचल्यास त्याचा त्यांना फायदा होतो.


लठ्ठपणा - ज्या ठिकाणी कान टोचले जातात तेथे भूक लागण्याचा बिंदू असतो. ज्यावर छिद्र केल्याने पनचक्रिया दुरुस्त होते आणि लठ्ठपणा येण्याची शक्यता कमी असते.


ताण - एक्यूपंक्चरनुसार जेव्हा कान टोचले जाता तेव्हा क्रेंद्र बिंदूवर दबाव पडल्यामुळे अस्वस्थपणा आणि मानसिक आजार दूर करण्यात मदत मिळते.


डोळे - एक्यूपंक्चरनुसार कानाच्या खालील भागावर केंद्रीय बिंदू आहे. जेथून डोळ्यांच्या रक्तवाहिन्या पास होतात. या बिंदूला दाबल्याने डोळ्यांची शक्ती सुधारते.


कान - जेथे कान टोचले जातात तेथे एक पॉइंट असतो. जो स्पष्ट ऐकू येण्यास मदत करतो.


पुरुषांना लाभ: पुरुषांच्या वीर्य संवर्धनातदेखील याने लाभ मिळतो.


लहानपणीच टोचावे कान

हिंदू धर्मात मुलांचे कान टोचणे हा एक संस्कार आहे. लहानपणीचं मुलगा असो वा मुलगी सोनाराकडून एक टोकटार सोन्याच्या ताराने कान टोचले जातात.




वैज्ञानिक कारण


कान टोचल्याने विचार करण्याची शक्ती वाढते. डॉक्टर म्हणतात की याने उच्चारण स्पष्ट होतं आणि कानातून मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनीत रक्त प्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे व्यक्तीला क्रोधावर नियंत्रण ठेवता येतं आणि सहनशीलता वाढते. कानाच्या पाळीमागे दमा व इतर रोगांच्या संबंधीत नसा असतात म्हणून तो भाग टोचलेला असणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे........

1,634 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Comments


bottom of page