Tension हा शब्द आजकाल पर्वणीचा झाला आहे.अगदी शाळकरी मुलांपासून ते वृद्धानपर्यंत सर्वानाच कशाचं तरी tension असतं.या ताणामुळे च अनेक शारीरिक व मानसिक व्याधींना शरीर कमी वयात बळी पडतं.पण काय असतं हे tension म्हणजे ?हे निर्माण कसं होतं शरीरात?
आपला भावनिक मेंदू सतत प्रतिक्रिया करत असतो.या प्रतिक्रियांचा परिणाम म्हणुन आपला ताण वाढत असतो.पुरातन काळात जंगलात राहणाऱ्या माणसाला जर कुठला धोका असेल तर त्याचे सिग्नल शरीराला मिळून पळून जायला किंवा लढायला शरीरात जास्त उर्जा निर्माण व्हावी व यासाठी शरीरात काही बदल केले जावे यासाठी ही योजना होती .आधुनिक काळात जीवाचा असा धोका राहीला नाही पण ही योजना तशीच राहीली .आधुनिक काळात माणसाने अनेक यंत्रांचा शोध लावला,त्यामुळे शारीरिक श्रमाची कामे कमी झाली.याउलट बैठे आणि बौद्धिक कामं वाढलीत.
बुद्धिवादी माणसाचे तर्कनिष्ठ व बौद्धिक प्रश्न शरीराने पळून सुटणारे नव्हते.पण भावनिक मेंदूची प्रतिक्रिया करणे सुरूच राहीले.जसा जसा काळ पुढे सरत गेला तसतसा भावनिक मेंदू अधिकच सक्रिय(active) व संवेदनशील (sensitive)होत गेला.आता हा अतिरिक्त ताण कमी करायचा असेल तर आपल्याला आपल्या भावनिक मेंदू(Amygdala)ला शांत राहण्याचं व प्रतिक्रिया न करण्याचं training द्यावं लागेल.तरच आपण या ताणापासून व त्यामुळे होणाऱ्या शरीराच्या नुकसानापासून स्वतःचा बचाव करु शकु.हे कसं शक्य होईल ?
आपण सगळेच उदासी ,भीती चिंता तणाव या विघातक भावनांपासून वाचण्यासाठी स्वतः ला सतत गुंतवून ठेवत असतो.वेगवेगळ्या कलांचा आस्वाद घेणे ,नवीन गोष्टी शिकणे ,आपल्या मनाचे रंजन करणे ,छंद जोपासणे यातून तात्पुरते विघातक विचार दूर होतात पण रिकामे बसले की परत हेच विघातक भाव मनाचा ताबा घेतात.भविष्याची चिंता ,अपमानाचे दुखः(विषाद )
एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती या भावना डोकी वर काढतात.अशावेळी या सर्व विघातक भावनांपासून पळून न जाता त्यांचा स्वीकार केला तर Amygdala शांत होतो असे आज मेंदू विज्ञानाने सिद्ध केले आहे.दिवसातून काही वेळ तरी आपल्या भावनांपासून पळून न जाता त्याना सजगतेने जाणले ,त्यांचा स्वीकार केला की भावनांची तीव्रता व त्यामुळे घडून येणारे वर्तन कमी होते.आत्ता या क्षणी माझ्या मनात हे हे विचार आहेत हे कोणतीही प्रतिक्रिया न करता जाणले तर विघातक विचारांची वारंवारता ,तीव्रता व कालावधी देखील कमी होतो.पण असे विचारांशी सजग होत असताना त्याला चांगली ,वाईट ,सकारात्मक नकारात्मक अशी कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही.यालाच सत्वावजय चिकित्सेच्या भाषेत साक्षी भाव असे म्हणतात .
माणुस हा जन्मापासून कर्ता, भोक्ता आणि साक्षी या तीन भूमिकेत काम करतो.चांगले संगीत ऐकणे,सुग्रास जेवणाचा आनंद घेणे ,चित्रपट बघणे अशी सगळी कामे करताना मनुष्य भोक्ता भूमिकेत असतो.भोक्ता भूमिकेत आनंदाचा उपभोग घेतो .पण आसपासची परिस्थिती आनंददायी नसेल तर तिला बदलण्यासाठी त्याला कर्ता व्हावं लागतं काम करावं लागतं ,पण जर ही परिस्थिती बदलण्यासारखी नसेल तर त्याला दुःख होतं.मग हे दुःख भोक्ता भावाने भोगत राहीले तर ते वाढीसच लागतं.आणि मनाच्या आणि परिणामी शरीराच्या अस्वास्थ्यास कारणीभूत होतं.मग अशावेळी साक्षीभावाने अशा गोष्टीकडे बघितले,त्याचा स्विकार केला तर या दुखःची ,या भावनांची तीव्रता कमी होते.मन शांत होतं
.तर कर्ता आणि भोक्ता आपण जन्मापासूनच असतो.पण साक्षीभाव विकसित करावा लागतो.नियमित ध्यानाच्या अभ्यासाने हे साध्य होऊ शकतं.पण साक्षी ध्यान म्हणजे पूर्वी मुनी करत त्याप्रमाणे काही अगम्य गुढ असे नाही ,तसेच त्यासाठी तासनतास ध्यान लावून बसावे असेही काही नाही. तर प्रत्येक क्षणाला आत्ता या क्षणी मझ्या मनात काय विचार आहे हे कुठलीही प्रतिक्रिया न देता, त्या विचारांबद्दल judgemental न होता जाणणे आणि त्याचा स्विकार करणे ,यालाच विचारांप्रती साक्षी होणे असे म्हणावे.तसेच असे विघातक विचार येतात तेव्हा शरीरात काही बदल होत असतात.तेव्हा अशा वेळी शरीरात काय होतं आहे हे जाणले ,शरिराकडे लक्ष दिले तर विघातक विचारांची शृंखला थांबते.
पण जास्त विचार करणाऱ्या माणसांचा एक अजून प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ते विचारांच्या समुद्रात वाहून जातात,आपण किती वेळ विचारच करतो आहे किंवा एकीकडे काही कामही करत असु तरी मन मात्र कुठल्यातरी विचारात आहे ह्याची जाणीवच त्याना होत नाही ,अशावेळी मन विचारात आहे याचे भान येणे महत्वाचे .असे भान आले तर तो त्या विचारांना प्रतिक्रिया न देता बघु शकतो त्यांचा स्विकार करु शकतो.म्हणजे पहिली पायरी ही आपण विचारात आहो हे जाणणे.आणि मी किती वेळचा विचार करतो आहे ,हा विचार जात का नाही मनातून असा स्वतः ला दोष न देता ,न चिडता,न अस्वस्थ होता ,हा विचार आहे असा त्याचा स्विकार करतो तेव्हा तो विचार यायचा कमी होतो.आपण त्याला प्रतिक्रिया देत नाही म्हणजे विचाराला महत्व देत नाही.तेव्हा त्याची वारंवारता व विघातकता कमी होते
Kommentare