स्वादिष्ट आणि पौष्टिक गाजर हलवा
- सौ. साधना लाठकर
- Jan 9, 2021
- 1 min read
साहित्य :
गाजर - १ किलो
साखर, - १/२ किलो
खवा - १०० ग्रॅम
साजूक तूप - १/२ वाटी
काजू बदाम काप

कृती : .
प्रथम गाजर स्वच्छ धुवून घ्या.
नंतर गाजराचे साल काढून किसून घ्या.
कढईत तूप घालून त्यात कीस ८- १० मिनिटे वाफवून घ्या.
नंतर त्यात साखर घाला आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या.
साखर घातल्यानंतर मिश्रण पातळ होते ते घट्टसर होईपर्यंत १०-१२ मिनिटे परतून घ्यावे
नंतर त्यात खवा घालावा आणि एकटा करून ४-५ मिनिटे परतून घ्यावे.
गरमागरम गाजर हलवा तयार.
काजू व बदाम घालून गाजर हलवा खाण्यासाठी द्या.
Comments