top of page
  • श्री विनोद पंचभाई

गणपतीचे प्रकार किती व कोणते?

श्री. के. व्ही. श्रीनिवसन्‌ यांनीं ‘गणपतीची उपासना’ या विषयावर लिहिलेल्या लेखांत (‘हिंदु’ : ३ मार्च १९६८) गणपतीचे ३२ प्रकार दिले आहेत. त्याशिवाय आणखीहि जे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणीं मिळाले त्यांची ही एकूण यादी :



hindupad.com


१. बाल : चार हात असून तो कमळावर बसलेला आहे.

२. तरुण : आठ हात असून तो बसलेला आहे.

३. भक्त : चार हात आहेत.

४. वीर : सोळा हात असून तो उभा आहे.

५. शक्ति : चार हात असून तो विवाहित आहे. डाव्या मांडीवर शक्ति प्रतिष्ठत आहे.

६. ध्वज : चार हत्तींचीं डोकीं व चार हात आहेत.

७. सिद्धि : दोन उजवीकडे व तीन डावीकडे असे एकंदर पांच हात आहेत व तो कमळावर बसलेला आहे.

८. उच्छिष्ट : सहा हात आहेत.

९. विघ्न : आठ हात आहेत.

१०. क्षिप्र : चार हात असून तो उभा आहे.

११. हेरम्ब : हा दशभुज असून त्याला पांच हत्तीचीं डोकीं आहेत व तो सिंहावर आरूढ झालेला आहे.

१२. लक्ष्मी : दोन बायका असून आठ हात आहेत. याचा वर्ण शुभ्र आहे.

१३. महा : त्रिनेत्र असून दहा हात आहेत. याची शक्ति डाव्या मांडीवर असून याचा वर्ण लाल आहे.

१४. विजय : हा घुशीवर (कदाचित मोठा उंदीर असावा) बसलेला असून याला चार हात आहेत.

१५. नृत्य : हा नाचण्याच्या आविर्भावांत असून याला सहा हात आहेत. उजवा पाय वर उचललेला आहे.

१६. ऊर्ध्व : सहा हात असून याची शक्ति डाव्या मांडीवर आहे. रंग पिवळा आहे.

१७. एकाक्षर : चार हात असून तो आपल्या उंदीर वाहनावर बसलेला आहे.

१८. वर : तीन डोळे असून चार हात आहेत.

१९. त्र्यक्षर : चार हात आहे.

२०. क्षिप्रप्रसाद : सहा हात आहेत.

२१. हरिद्रा : चार हात असून वर्ण पिवळा आहे.

२२. एकदन्त : चार हात आहेत.

२३. सृष्टि : चार हात असून घूस (किंवा मोठा उंदीर) या वाहनावर बसलेला आहे.

२४. उदंड : याची शक्ति याच्या डाव्या मांडीवर असून याला दहा हात आहेत.

२५. ऋणमोचन : चार हात आहेत.

२६. द्विमुख : दोन डोकीं असून चार हात आहेत.

२७. तुंडी : चार हात असून हा उभा आहे.

२८. मुम्मुग : तीन डोकीं आणि सहा हात आहेत.

२९. श्रृंग : आठ हात असून तो सिंहावर बसलेला आहे.

३०. योग : चार हात असून तो तपश्चर्या करीत आहे.

३१. दुर्ग : आठ हात आहेत.

३२. संकटहर : हा कमळावर बसलेला असून शक्ति त्याच्या डाव्या मांडीवर बसलेली आहे. याला चार हात आहेत.

(येथपर्यंतचे ३२ प्रकार श्री. श्रीनिवासन्‌ यांच्या लेखांतून)

आणखीहि गणपतींचे प्रकार उपलब्ध आहेत, ते पुढीलप्रमाणें :

३३. नर्तक : आठ हात आहेत व शरीराचा रंग सोनेरी पिवळा आहे. डावा पाया पद्‌मासनावर असून उजवा पाय अघांतरीं आहे.

३४. पिंगल : हात सहा असून रंग पिंगट आहे.

३५. ज्योति : ग्रहांचा मुख्य सूर्य, तोच गणपति म्हणून याला ज्योतिर्गणपति म्हटलें आहे. वर्ण गोरा.

३६. पुष्कर : ‘सिन्दुरामानन’ असें याचें वर्णन केलें आहे.




याशिवाय -


सिद्ध, चिंतामणी, कुमार, वल्लभ, सुवर्णकर्षण हे सुद्धां आहेत.


महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध आठ गणपतिक्षेत्रांतील गणपतींना ‘अष्टविनायक’ म्हणतात. त्यांची नावे, स्थाने व जिल्हे अनुक्रमे पुढीलप्रमाणे होत:



(१) मोरेश्वर (अथवा मयूरेश्वर); मोरगाव; पुणे. (२) सिद्धिविनायक; सिद्धटेक; नगर. (३) बल्लाळेश्वर; पाली; कुलाबा. (४) वरदविनायक (अथवा विनायक); महड (अथवा मढ); कुलाबा. (५) चिंतामणी; थेऊर; पुणे. (६) गिरिजात्मज; लेण्याद्री; पुणे. (७) विघ्नेश्वर; ओझर; पुणे. (८) श्री. गणपती; रांजणगाव; पुणे.




732 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Comentários


bottom of page