ताज्या मटारची हिरवीगार आमटी
- सौ. जान्हवी देशपांडे
- Jan 4, 2021
- 1 min read
साहित्य :
ताजे मटार - १ वाटी
लसूण पाकळ्या ४-५
अद्रक- १ इंच
हिरवी मिरची -५-७
कोथिंबीर - १ १/२ वाटी
ओले खोबरे -२-३ चमचे
कडीपत्ता - ३-४ पाने
मोहरी-पाव चमचा
जीरे- पाव चमचा
मीठ चवीनुसार
हिंग- १/४ छोटा चमचा
हळद - १/४ छोटा चमचा
पाणी - ४ वाट्या

कृती :
प्रथम मिक्सरमधून मिरची, अद्रक ,लसूण,ताजे स्वच्छ धुवून घेतलेले मटार ,कोथिंबीर, ओले खोबरे एकत्र बारीक करुन घ्यावे. .
नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात जीरे व मोहरी घालावी व फोडणी मस्त तडतडली की त्यात हिंग ,कडीपत्ता,आणि बारीक केलेले वाटण घालावे.
त्यात हळद आणि मीठ घालून छान परतून घ्यावे.
नंतर त्यात पाणी घालावे आणि मस्त उकळी येऊ द्यावी.
मटार आमटी तयार.
टिप :
ही आमटी मटार उकडून पण करता येते .
आमटी करताना पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो.
ही आमटी भात,भाकरी किंवा पोळी सोबत ही मस्त लागते.
Comentários