top of page
  • श्री विनोद पंचभाई

!!◆!! श्रीगुरुचरित्र पारायण पद्धती !!◆!! भाग ३

◆ श्री गुरूचरित्रातिल प्रत्येक अध्यायातील फलश्रुती ◆


🔹 अध्याय पहिला ~ नित्य गुरूचिंतनाने संपुर्ण जिवन मंगलमय होते.

🔹 अध्याय दूसरा ~ कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात.

🔹 अध्याय तिसरा ~ गुरुकोपाचे शमन होऊन व्रताची पूर्तता होते.

🔹 अध्याय चौथा ~ स्त्रीछलणाचा दोष जाऊन स्वहिताचे रक्षण होते.

🔹 अध्याय पाचवा ~ शारीरिक व्यंगे नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते.

🔹 अध्याय सहावा ~ दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ति होते.

🔹 अध्याय सातवा ~ पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.

🔹 अध्याय आठवा ~ बुध्दीमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.

🔹 अध्याय नववा ~ सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.

🔹 अध्याय दहावा ~ नवस फळाला येतात. चोरिचा आळ दुर होतो.

🔹 अध्याय अकरा ~ वांचदोष तसेच वेड नाहीसे होते.

🔹 अध्याय बारा ~ संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते.

🔹 अध्याय तेरा ~ सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीश्या होतात.

🔹 अध्याय चौदा ~ प्राणघातक गंडांतरापासून स्वरक्षण होते.

🔹 अध्याय पंधरा ~ तिर्थयात्राना सफलता प्राप्त होते.

🔹 अध्याय सोळा ~ आदरनियचि निंदा, अपमान केल्याचा दोष दुर होतो.

🔹 अध्याय सतरा ~ ज्ञान व गुरूकृपा यांचा लाभ होतो.

🔹 अध्याय अठरा ~ संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य दुर होते.

🔹 अध्याय एकोणीस ~ भाग्यवृध्दी होते.सद्दगुरूंचा लाभ होतो.

🔹 अध्याय विसावा ~ गुरूस्मरण करूनी मनी. पुजा करी वो गुरूचलणी तुझे पाप होईल धुनी, ब्रम्हासबंध परिहरेल !!

🔹 अध्याय एकविस ~= मृत्यू भयापासून मुक्तता.

🔹 अध्याय बाविस ~ वांझपण दुर होते व बाळंतिणीला चांगले दुध येते.

🔹 अध्याय तेविस ~ पिच्छाचबाधा नष्ट होते. राज्यमान्यता प्राप्त होते.

🔹 अध्याय चोवीस ~ भ्रम व वैचारिक गोंधळ दुर होऊन मनशांती लाभते.

🔹 अध्याय पंचवीस ~ अपात्र लोकांच्या. संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.

🔹 अध्याय सव्वीस ~ शत्रू निषभ्रम होऊन शरण येतात.

🔹 अध्याय सत्तावीस ~ गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विविद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती.

🔹 अध्याय अठ्ठावीस ~ वाईट कर्माचे दोष होतात.

🔹 अध्याय एकोणतीस ~ स्त्रीछल दोष, वासनादोष दुर होऊन पावित्र्य लाभते.

🔹 अध्याय तिसावा ~ कुमारिकांना ईच्छीत पतीची प्राप्ती होते व सौभाग्य वृद्धी होते.

🔹 अध्याय एकतीस ~ पतिवर येणारी विघ्ने टळतात.

🔹 अध्याय बत्तीस ~ वैधव्याचे दु:ख टळते अथवा सुसह्य होते.

🔹 अध्याय तेहतीस ~ वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.

🔹 अध्याय चौतीस ~ प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृध्दी होते.

🔹 अध्याय पस्तीस ~ हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते व तुटलेले सबंध पुन्हा जुळतात.

🔹 अध्याय छत्तीस ~ चुकिची समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.

🔹 अध्याय सदतीस ~ मुढ बुध्दी नष्ट होऊन योग्य ज्ञान प्राप्त होते.

🔹 अध्याय अडतीस ~ निंदा. करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न रहाते.

🔹 अध्याय एकोणचाळीस ~ सदगुरुंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.

🔹 अध्याय चाळीस ~ कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप रहाते.

🔹 अध्याय एक्केचाळीस ~ सदगुरुंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.

🔹 अध्याय बेचाळीस ~ विद्या व फळांची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते.

🔹 अध्याय त्रेचाळीस ~ गर्व व क्रोध नाहिसा होऊन ऐश्वर्य प्राप्ती होते.

🔹 अध्याय चौवेचाळीस ~ मनातील भ्भ्रम दुर होऊन योग्य मार्ग सापडतो.

🔹 अध्याय पंचेचाळीस ~ कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरूनिष्ष्ठा सफल होते, बुध्दी वाढते.

🔹 अध्याय सेहेचाळीस ~ चिंतनाची स्थिरता लाभते व ज्ञानाची प्राप्ती होते.

🔹 अध्याय सत्तेचाळीस ~ पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुध्दी प्राप्त होते.

🔹 अध्याय अठ्ठेचाळीस ~ गुरूनिषठेने विपूल समृद्धी प्राप्त होते. विघ्ने टळतात.

🔹 अध्याय एकोणपन्नास ~ तिर्थक्षेत्रांबद्दल आदर वाढतो व सर्व पापांचे क्षालन होते.

🔹 अध्याय पन्नास ~ ग्रंथी रोग त्वचारोग नष्ट होऊन शरिरसुख लाभते.

🔹 अध्याय एक्कावण ~ जीवनात सुखसमृध्दी मिळते. अंती मोक्ष प्राप्ती होते.

🔹 अध्याय बावन्न ~ श्रध्देला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.


भक्ती, मुक्ती परमार्थ |

जे जे वांछी मनी आर्त ||

त्वरित होये साध्यंत |

गुरूचरित्र ऐकता ||


●◆● श्री दत्ताची आरती ●◆●


दत्ताची आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन'च्या भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल.


दत्ताची आरती


त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।

त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।

नेति नेति शब्द न ये अनुमाना ।

सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।

आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।

अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।

पराही परतली तेथे कैंचा हेत ।

जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। २ ।।

दत्त येऊनिया उभा ठाकला ।

सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।

जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। ३ ।।

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।

हारपले मन झाले उन्मन ।

मीतूपणाची झाली बोळवण ।

एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।। ४ ।।

- संत एकनाथ


● आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ ●


आता आपण या आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ समजून घेऊया. अर्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास आणि तिची भक्ती वाढण्यास साहाय्य होते.

१. ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।’ याचा अर्थ दत्त हा (कार्यानुरूप) त्रिगुणात्मक आहे, त्रैमूर्ती आहे. श्री दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे. हे तीन देव उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित असल्यामुळे हे देव वस्तुतः त्रिगुणातीत असूनही कार्यानुसार गुणाश्रयी आहेत, म्हणजे अनुक्रमे रज, सत्त्व आणि तम या त्रिगुणांना ते आश्रय देतात.

२. ‘नेति नेति शब्द न ये अनुमाना ।’ याचा भावार्थ वेदांनी श्री दत्ताचे स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना काहीच अनुमान न करता आल्याने ‘नेति, नेति’ म्हणजे ‘असे नाही, असे (ही) नाही’, एवढेच ते सांगू शकले.

३. ‘सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त।’ म्हणजे आत-बाहेर पूर्णपणे तू एक दत्त केवळ गुरुतत्त्वरूप, ईश्वरतत्त्व असलेला आहेस.

४. ‘अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।’ म्हणजे आम्हा अभागी, दुर्दैवी लोकांना तुझे माहात्म्य कसे कळणार?

५. ‘पराही परतली तेथे कैंचा हेत ।’ म्हणजे श्री दत्ताचे वर्णन करायला गेलेली परावाणीही परत फिरली त्यात कोणता हेतू असावा बरे? दत्ताचे स्वरूप तुर्यावस्थेच्या पलीकडे असल्याने परावाणीही तिथे पोहोचू शकत नाही. यामुळे ती काही न बोलताच परत फिरली.

६. ‘जन्ममरणाचा पुरलासे अंत ।’ याचा भावार्थ आहे, श्री दत्ताचे स्वरूप नित्य आणि अनादी-अनंत असे आहे. तिथे जन्ममरण हे शब्दच संपतात.

७. ‘जन्ममरणाचा फेरा चुकविला ।’ याचा भावार्थ जन्ममरणाच्या फेर्यातून माझी सुटका केली. मला मोक्ष (टीप) दिला, असा आहे.

८. ‘मीतूपणाची झाली बोळवण ।’ याचा भावार्थ आहे, अद्वैतावस्था प्राप्त झाल्याने मी-तू हा आपपरभाव संपला आहे.

‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो आणि भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्री दत्ताच्या चरणी प्रार्थना आहे.


47 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Comments


bottom of page