हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी
- सौ.श्वेता गिरधारी- देशपांडे
- Jan 1, 2021
- 1 min read
साहित्य :
हरभऱ्याची कोवळी पाने (भाजी) - २ वाटी
भाजलेले बेसन - ३ चमचे
शेंगदाण्याचा कुट -४ चमचे
७\८ हिरव्या मिरच्या व ८\१० लसुण पाकळ्यांची पेस्ट
तेल - 3चमचे
मीठ चवीनुसार
पाणी- १ ग्लास

कृती :
प्रथम हरभऱ्याची कोवळी पाने (भाजी) थोडे पाणी घालून मिक्सरमधून फिरवून बारीक पेस्ट करून घ्यावी.
गॅसवर कढईत तेल गरम करून घ्यावे व त्यात लसूण मिरचीची पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे.
त्यानंतर त्यात मिक्सरमधे फिरवून घेतलेली भाजीची पेस्ट टाकून थोडे पाणी घालावे.
भाजी छान परतून घेतल्यावर त्यात भाजलेले बेसन व शेंगदाणे कूट घालावा आणि भाजी छान शिजवून घ्यावी.
सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालावे.
भाजी चांगली शिजली की गॅस बंद करावा.
गरम भाजी खाण्यासाठी तयार आहे.
टिप - ही भाजी करताना बेसन हे भाजूनच घ्यावे कारण यामुळे भाजीचा हिरवा रंग कायम राहतो.
Comments