top of page
  • श्री विनोद पंचभाई

ईश्वर इच्छा असेल तसेच घडते

फक्त आपण हे लक्षात ठेवावे...

आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख-दुःख उरत नाही. ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते; किंबहुना, हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे. हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते.

खरोखर, तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की, सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा, आणि नीतिला धरून राहा; त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतिला, शुद्ध आचरणाला, फार महत्व आहे.

जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो, त्याला साहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागू या. दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा. हे मात्र नक्की लक्षात ठेवा...


१. काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते.


२. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा असू नये.


३. उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही, याला काय करावे? यावर रामबाण असा एकच उपाय आहे, तो म्हणजे आजपासून काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन तेवढा वेळ II राम कृष्ण हरि II ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणात घालविणे.


४. सुखाने प्रपंच करा पण II राम कृष्ण हरि II ह्या मंत्राचं अखंड नामस्मरण चालू ठेवा.


५. II राम कृष्ण हरि II ह्या मंत्राचं अखंड नामस्मरण करत करत प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल.


६. जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काही जण म्हणतात. परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का? कधीही होणे शक्य नाही, तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही.


७. फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय.


८. परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते.


९. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्तीदेखील नको असे म्हटले, फक्त संतसंगती दे असे म्हटले.


१०. जगातले आपले समाधान किंवा असमाधान, ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. माझ्या करिता मी नसून, मी लोकांकरिता आहे.माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे, ही वृत्ती आपण ठेवावी.


लक्षात ठेवा आपण भगवंताचे अनुष्ठानात राहून कर्म करीत राहिल्यास यश येणार हे नक्की.

| | राम कृष्ण हरि | |

18 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Comments


bottom of page