top of page
  • श्री विनोद पंचभाई

वसुबारस व्रताची कथा अशी

एक म्हातारी होती. तिची एक सून होती. त्यांच्या घरात गुरे होती. गव्हाळी-मुगाळी वासरे होती. एक दिवस सासू शेतावर गेली. तिने जाताना सुनेला सांगितले, की गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव. तिला सांगायचे होते, की गहू-मूग शिजवून ठेव. पण सुनेने भलताच अर्थ घेतला आणि गोठ्यातील गव्हाळी-मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले. म्हातारी घरी आल्यावर सुनेने पाने मांडली. पानातील मांस बघून म्हातारी घाबरून गेली. तेव्हा सुनेने घडलेला सारा प्रकार तिला सांगितला. त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनवू लागली. ‘देवा देवा! कोपू नको. सून अजाण आहे. तिचा अपराध पोटात घाल. माझी वासरे जिवंत कर.’ देवाने त्या म्हातारीचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई रानातून परत येण्यापूर्वी वासरे जिवंत केली. म्हातारीने मग गाई-वासरांची पूजा केली. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून मग ती जेवली.


या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते..या दिवशी

गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

6 views0 comments

Comments


bottom of page