top of page
  • सौ. श्वेता गिरधारी - देशपांडे

खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी

साहित्य - कोथिंबीर १जुडी, लसूण पाकळ्या ८-१०, ६-७ हिरव्या मिरच्यांची पेस्ट, जिरे -२ चमचे, तीळ- १ चमचा , मीठ -चवीनुसार, हळद -१/२ चमचा, लाल तिखट- १ चमचा, धने पावडर- २ चमचे, ज्वारीचे पीठ १ वाटी, बेसन १ वाटी



कृती:

  • प्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी.

  • त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ,धने पावडर, ज्वारीचे पीठ, बेसन पीठ, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकुन पीठ चांगले मळून घेणे.

  • मळलेल्या पिठाच्या वड्या करून त्यावर तीळ पसरवून टाकावेत.

  • तयार वड्या १०-१५ मिनिटे उकडून घ्याव्यात.

  • वड्या गार झाल्या की त्या तळून घ्याव्यात.

  • गरमागरम कोथिंबीर वडी तयार

  • तयार झालेली कोथिंबीर वडी तुम्ही टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणी सोबत खाऊ शकता.


टिप : कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली असल्यामुळे पीठ मळताना पाणी वापरण्याची गरज पडत नाही तरी जर मिश्रण कोरडे झाले असेल तर थोडे पाणी घालून पीठ मळावे.


45 views0 comments

Recent Posts

See All

Comentarios


bottom of page