ॐ नमः शिवाय
महाशिवरात्र महत्व व पुजा विधान व ज्योतिष शास्त्रनुसार आपल्या राशी नुसार कशी पुजा करावी ती माहिती
आज,दिनांक ११/०३/२०२१ रोजी गुरुवार अत्यंत पवित्र असा श्री महाशिवरात्री हा सण आहेत या बद्दल माहिती पाहू.....
महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे.
हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा.
महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिवमंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात.
महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. हे व्रत नैमित्तिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे आहे असे मानले जाते. शिवरात्रीच्या रात्री चार प्रहर पूजा करावी असा संकेत आहे
या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याची दुसर्या दिवशी सकाळी समाप्ती होतो. दुसर्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.
महाशिवरात्रीचे व्रत कुमारिका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात असे मानले जाते. शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे.
भारतात अनेक शिवमंदिरे असून शिवरात्रीला ठिकठिकाणी अशा मंदिरात यात्रा भारतात.
अन्य कोणतेही उपास न पाळाणारे हिंदू पुरुष आश्विनी आणि कार्तिकी या दोन एकादशांना आणि महाशिवरात्रीला उपवास करतात.
महाशिवरात्री’ म्हणजे काय ?
पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.
महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?
शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.
व्रत आचरण्याची पद्धत व विधी
उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी.
शिवपूजेची वैशिष्ट्ये
१) शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
२) शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.
३) शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.
४ ) शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात.
५ ) शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.
महाशिवरात्रीला शिवाचा नामजपचे महत्त्व
महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा || नम: शिवाय || या शिवाचा पंचाक्षरी मंत्राचा जास्तीतजास्त करावा.
माघ महिना उगावला, शिवरात्र येऊ लागली की घरातली मोठी माणसं शिवलिलामृत, काशीखंड ह्या सारख्या ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी ‘ॐ नमः शिवाय’ ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात, तर कुणी हौशी मंडळी ह्या महाशिवरात्रीची पर्वणी साधून बारा ज्योतीर्लिंगे किंवा पुरातन शिव मंदिरांना आवर्जून दर्शन भेट देतात.
ह्या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे, जप करणे, बेल पत्र वाहणे, उपास करणे इ. गोष्टी आवर्जून केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान, महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते. त्याला ज्ञान प्राप्त होते. त्याला उत्कर्षाचा, मुक्तीचा विकासाचा मार्ग सापडतो.
महाशिवरात्रीची कथा:-
शिव उपासनेमुळे माणसाच्या दृष्ट प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार, विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो, ह्या बद्दल ‘शिवलिलामृत’ मध्ये एक कथा आहे ती अशी की :
असाच एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात गेला. जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू. दुपारपासून धनुष्य बाण सज्ज करून तो बसला खरा !… पण… दिवस गेला-संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एक ही प्राणी त्या जलाशयाकडे आला ही नाही अन् शिकार मिळालीही नाही.
तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली. पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली. तो आता बाण सोडणार तोच त्या हरिणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या ! तू तर शिकारी आहेस. शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तू आम्हाला मारणार हे ही खरं आहे. पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो. आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची. पण त्या हरिणाच्या प्रमुखानी परत येण्याच वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला “ठीक आहे उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.”
हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली. आता रात्र कशी काढायची. तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नमः शिवाय म्हटले. नकळत नाममंत्राची पारध्याला गोडी लागली. सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता, त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती.
तोच ते हरिण आले आणि म्हणाले, “पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. मला आता मार…” इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली. “त्याला नको मला मार, तो माझा पती आहे. त्याच्या आधी मला मार. मला माझा पत्नी धर्म पाळू दे.” तेवढ्यात ती पाडसं पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार. ते आमचे आई वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांच रक्षण करू दे.
एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये. त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ. पारध्यानं सर्वानाच जीवनदान दिले.
भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांचाच उद्धार केला. हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन् पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा.
भगवान शंकर हे तंत्राचे महादेव आहेत म्हणून तंत्राच्या चार रात्रींपैकी एक रात्र महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. यंदा मार्च महिन्यात ही रात्र महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाणार आहे.
याच दिवशी शिवज्योती प्रकट झाली होती आणि शिव-पार्वती यांचा विवाहसुद्धा झाला होता.
पुजा व महत्व
महाशिवरात्री उपासना महिमा
सृष्टीचा निर्माणकर्ता श्री ब्रम्हदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव हे आहेत. म्हणूनच मृत्यू किंवा मोक्ष या वर श्री महादेवाचा अंकुश आहे असे म्हटले जाते. तसेच गतजन्मातील संचित पातकांमुळे आपणास या जन्मात आकस्मिक मृत्यू , मतीमंदत्व, मानसिक व शारीरिक आसाद्य आजार, दुखे:, संकटे, हालअपेष्टा किंवा दारिद्र्य भोगावे लागते. या सर्वां पासून मुक्ती देण्याचे कार्य श्री महादेव करतात. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण, निराकार परब्रम्ह होय.अशा या मोक्षकारी महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी जो कोणी शिवाची उपासना करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. एकूणच या दिवशी केलेली उपासना हि मानवी जीवनाला सुख शांती व समृद्धी देण्याचा एक राज मार्ग आहे, अशी हि फलदायी उपासना आहे.
आता तुम्ही विचाराल हि उपासना करतात कशी ?
ज्या कोणाला आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करावयाची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने मग तो कोणत्याही जातीचा असो व धर्माचा असो त्याने हि उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. व श्री महादेव म्हणजे सर्वात लवकर व साध्या पूजेने सुद्धा अति प्रसन्न होणारे दैवत आहे. म्हणूनच या देवाला भोळा शंकर असेही म्हटले जाते. एवढेच नाही तर आपल्या हातून अगदी अजाणते पणे जरी शिव पूजा घडली तरी हा भोळा शंकर लगेच प्रसन्न होतो. आणि उपासना करणे म्हणजे तरी काय ?
ज्या प्रमाणे आपण आपल्या प्रीय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करतो किंवा त्या व्यक्तीला आवडणार्या वस्तू आपण भेट देतो त्याच प्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करणे किंवा त्या देवतेला त्या गोष्टी अर्पण करणे किंवा भेट देणे म्हणजेच त्या देवतेची उपासना करणे असे होय.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात त्याने भोळा महादेव लगेच प्रसन्न होतो. मग महादेवाला कोणत्या गोष्टी आवडतात ?
१) अभिषेक :- महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. मग तो अभिषेक तुम्ही साधे पाणी, दुध, दही किंवा उसाचा रस या पैकी कोणत्याही द्रव्याने केलात तरी चालतो.
२) फुले :- महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्यास तो लगेच प्रसन्न होतो. मग आपण पांढरी फुले मुख्यत्वे धोतर्याची फुले अर्पण करून महादेवाला प्रसन्न करू शकता.
३) वृक्ष :- महादेवाला बेलाचा वृक्ष तसेच चंदनाचा वृक्ष हे सर्वात प्रीय आहे मग तुम्ही महादेवाला बेलाची पानें किंवा फळे अर्पण करू शकता. तसेच तुम्ही एखादे बेलाचे झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करून ते जरी वाढवलेत व त्याची पूजा केलती तरी त्याचे पुण्य अपार आहे. म्हणून या दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे किंवा हि झाडे दान द्यावीत. त्याने भोळा शंकर प्रसन्न होतो.
४) फळे, धान्य किंवा वस्त्र :- कवठ हे फळ महादेवाला अतिप्रिय आहे तसेच बेल फळ किंवा नारळ हे देखील महादेवाला प्रीय आहेत. महादेवाला मुठभर तांदूळ अर्पण करावेत, किंवा केळी हे फळ महादेवाला अर्पण करावे. किंवा अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी. तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रीय असल्याने ते देखील तुम्ही अर्पण करू शकता.
५) स्तोत्रे :- शिवस्तुती चा पाठ वाचवा. शिवस्तुती हि सर्वात लवकर फलदायी होते. याने महादेव लगेच प्रसन्न होतात. तसेच शिवकवच पठन हे देखील अत्यंत उपयुक्त आहे.
६) उपासना मंत्र :- llॐ नम: शिवाय ll हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे. या मंत्राच्या सतत च्या जपाने श्री महादेव लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्व मनो: कामना पूर्ण होतात. या मंत्राची शक्ती अद्भुत आहे. ह्या मंत्रासाठी दीक्षा, होम, संस्कार,मुहूर्त,गुरुमुखाने उपदेश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते. या मंत्रात सर्व वेद व उपनिशिध्ये यांचे सार सामावले आहे.
७) दान धर्म :- सध्या कलयुग चालू आहे नि कलयुगात दान देणे हे अनन्य साधारण पुण्यकर्म समजले जाते, म्हणूनच श्री महादेवाला ज्या वस्तू प्रीय आहेत त्या पैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केलीत तर त्याचे हि फळ लाखो पटीने वाढते. या मध्ये तुम्ही दुध, तांदूळ, केळी , खडीसाखर, पांढरे वस्त्र, नारळ, बेलाचे व चंदनाचे झाडांची रोपे या गोष्टी दान देऊ शकता. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुखसमृधी प्राप्त होते यात शंकाच नाही.
८) ध्यान आणि शांतता :- शंभू महादेवाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रीय आहेत. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरावर महादेवाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळी नंतर दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे महादेवाचे ध्यान करावे या वेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात. व घरात बरकत होते. दारिद्र्य दूर होते.
९) मनातली इच्छा बोलणे :- ज्या प्रमाणे मुल रडल्यावर त्याची आई त्याला दुध पाजते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याच प्रमाणे आपण या महादेवाची उपासना केल्यावर हा भोळा शंकर नक्कीच प्रसन्न होतो. नि हा प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे. हि इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी त्याने फळ प्राप्ती लवकर होते.
शिवाला बेल वहाण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र जाणून घ्या !
बेलाच्या पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वहातो, तेव्हा बेलपत्राच्या अग्रावाटे शिवाचे तत्त्व वातावरणात पसरण्याचे प्रमाण अधिक असते. या पद्धतीमुळे समष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो. याउलट बेलाच्या पानाचे देठ आपल्याकडे आणि अग्र (टोक) पिंडीकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो, तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्त्व केवळ बेलपत्र वाहणार्यालाच मिळते. या पद्धतीमुळे व्यष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो.
खाली देलेली हि इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
" हे शंकरा मी तुला शरण आलो आहे. साक्षात तूच माझा आत्मा असून, माझी बुद्धी म्हणजे पार्वती माता होय. माझे प्राण म्हणजे शिवगण आणि देह म्हणजे शिवालय आहे. सारे विषयभोग म्हणजेच तुमची पूजा असून झोप हि समाधी होय. माझे चालणे म्हणजे तुमची प्रदक्षिणा करणे, बोलणे म्हणजे तुमची स्तुती करणे असून मी जी जी कर्मे करतो ती सारी तुमची आराधनाच करतो आहे. माझ्या हात, पाय, वाणी,कान,डोळे,मन,देह या पैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील त्या सर्वाना तू क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. हे महादेवा तुझा जय जय कर असो ! "
महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक राशी नुसार गरिबांना कोणत्या प्रकारचे दान करावे या विषयी थोडेसे ! संपूर्ण वाचा व आवडल्यास सर्वांना जरूर शेअर करा !
महाशिवरात्रीला शिवशंकरास साध्या थंड पाण्याने अभिषेक केला असता तसेच विविध वस्तूंचे दान गरिबांना केले असता महादेव मनातली इच्छा पूर्ण करतात असा अनुभव आहे. या अभिषेकाचा व दानाचा महिमा अपार आहे. तसेच कुंडलीत ज्या ग्रहांचा दोष आहे ते दोष सुद्धा या दानामुळे दूर होतात.
अभिषेक कसा करावा ?
भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ॐ नमः शिवाय हा मंत्र म्हणून कींवा गुरुजींकडुन संकल्पयुक्त थंड पाण्याने रुद्रअभिषेक करावा तसेच बिल्व पत्र , बेल फळ किंवा धोत्र्याचे फुल वाहावे.
राशी नुसार पुजन करावे
मेष- मध , गूळ , उसाचा रस व लाल फुल !
वृषभ - कच्चे दूध, दही, पांढरे फुल !
मिथुन- हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र !
कर्क- कच्चे दूध, लोणी, बिल्वपत्र व पांढरे फुल !
सिंह- मध , गूळ , शुद्ध तूप व लाल पुष्प !
कन्या- हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र व निळी फुले !
तुळ - दूध, दही, रंगीत फुले !
वृश्चिक- मध, शुद्ध तूप, गूळ बिल्व पत्र व लाल फुल !
धनु- शुद्ध तूप , मध , बदाम, पिवळे फुल व पिवळे फळ !
मकर- मोहरीचे तेल , तिळाचे तेल , कच्चे दुध, जांभळे, निळे फुल !
कुंभ- कच्चे दुध, मोहरीचे तेल, तिळाचे तेल , निळे फुल !
मीन- उसाचा रस , मध , बदाम, बिल्वपत्र, पिवळे फुल व पिवळे फळ !
विशेष सूचना :-
शिवपूजन कालावधी :- महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजेच, २४:२४ ते २५:१३ या कालावधीत वरील पैकी कोणत्याही प्रकारे आपण शिवपूजन केलेत तर महादेव प्रसन्न होतात. या काळात केलेले शिवपूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात शिवाची पूजा करावी त्यांना अभिषेक घालावा, बेलाची पानें अर्पण करावीत. कवठ या फळाचा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करावा. शिवाचे नामस्मरण करावे. शिवस्तुती किंवा शिव स्तोत्रे म्हणावीत. व मनातली इच्चा बोलावी. आपण जी इच्चा बोलाल ती पूर्ण होते असा आहे या महाशिवरात्रीच्या उपासनेचा महिमा.
वरील प्रकारे जर आपण शिवाची उपासना केलीत तर ऐहिक वैभव, स्वास्थ्य व मानसिक शांती लाभेल यात तीळ मात्रही शंका नाही. चला तर मग आता पासूनच उपासनेला सुरवात करून आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुख संपूर्ण बनवूयात.
या सात वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका
भगवान शंकारांसंबंधी सर्वात मोठा दिवस म्हणजे महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. पण, भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही देऊ नका.
१. शंख -श्री महादेवाच्या पुजेत शंखाने महादेवाला पाणी वाहू नये कारण शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असूराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.
२. हळद कुंकू- भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा कुंकु भगवान शंकरांना अर्पण केलेक जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.
३. तुळशी पत्र - असूरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.
४. नारळ पाणी - नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करुन त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण, भगवा शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.
५. उकळलेले दूध - उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.
६. केवड्याचे फूल - भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता.
७. कुंकू किेंवा शेंदूर - कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे
ॐ नम: शिवाय
Comments