हरवलेली व्यक्ती अथवा वस्तु हरवली असल्यास ती लवकर सापडावी या साठी उत्तम उपाय.
- श्री विनोद पंचभाई
- Jan 12, 2021
- 1 min read
कोणी व्यक्ती पळून गेली अथवा हरवली असल्यास
खालील प्रमाणे कृती करावी.
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान ।
तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥
हा मंत्र एका कागदावर लिहून काढावा. ध्यानस्थ होऊन १०८ वेळा वरील मंत्राचा जप करावा.
त्यानंतर तो कागद हरवलेल्या व्यक्तीची नेहमीची झोपावयाची जी जागा असेल त्या ठिकाणी रात्रीच्यावेळी जमिनीला स्पर्श होईल असा ठेवावा व त्यावर एखादा पाट अथवा लाकूड ठेवावे.
जर वरील कृती करणे शक्य नसेल तर , त्या व्यक्तीचे मनापासून स्मरण करावे आणि योग्य तो संकल्प करुन ध्यानस्थ होऊन १०८ वेळा वरील मंत्राचा जप करावा.
वरील कृतीमुळे पळून गेलीली अथवा हरवलेल्या व्यक्तीच्या कानात कोणीतरी "घरी चल... घरी चल..." असे सतत म्हणत असते.परिणामी ती पळून गेलीली अथवा हरवलेली व्यक्ती घरी परत येते.वस्तु हरवली असल्यास वरील मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास हरवलेली वस्तु सापडते. वरील उपाय करून पाहण्यास हरकत नाही.त्यामुळे झाला तर फायदाच होईल.तोटा निश्चितच नाही.
वरील मंत्राचा उपयोग आपले गेलेले वैभव पूर्ववत होण्यासाठीसुध्दा करण्यास हरकत नाही.
॥ शुभं भवतु ॥
Commenti