top of page
सौ. ज्योती गिरधारी

या हिवाळ्यात नक्की बनवून बघा मेथ्यांचे लाडू

साहित्य :


खोबऱ्याचा किस २५० ग्रॅम, खारीक पावडर २५० ग्रॅम, गूळ २५० ग्रॅम , गव्हाचे पीठ २५० ग्रॅम, तूप २५० ग्रॅम, मेथ्या ५० ग्रॅम, मनुका ५० ग्रॅम , खसखस ५० ग्रॅम, गोडंबीचे काप ५० ग्रॅम, चारोळी ५० ग्रॅम, काजू पावडर १२५ ग्रॅम, बदाम पावडर १२५ ग्रॅम, १०-१२ विलायचीची पावडर




कृती :

  • प्रथम गव्हाचे पीठ २०० ग्रॅम तुपामध्ये गुलाबीसर भाजून घ्यावे.

  • मेथीचे दाणे कोरडेच मंद आचेवर भाजून घ्यावेत व मिक्सर मधून त्याची बारीक पावडर करून घ्यावी.

  • नंतर खारीक पावडर , भाजलेले गव्हाचे पीठ, गूळ , खोबऱ्याचा किस, काजू पावडर , बदाम पावडर , विलायची पावडर, गोडंबीचे काप, खसखस, मनुका, चारोळी एकत्र मिसळून घ्यावे.

  • या मिश्रणात लागेल तसे तूप घालून त्याचे लाडू बांधावेत.

Recent Posts

See All

Comentários


bottom of page