साहित्य :
मोड आलेले मेथीचे दाणे: १ वाटी
भिजवलेली मूग डाळ : १/२ वाटी
कांदा :१
टोमॅटो : १
तिखट : २ चमचे
हळद : १/२ चमचा
हिंग : १/२ चमचा
मीठ : चवीनुसार
लसूण आद्रक पेस्ट :१ चमचा
मसाला : १ चमचा
कोथिंबीर
कृती :
मेथी दाणे स्वच्छ निवडून भिजायला टाकावेत.
साधारण ५-६ तासानंतर त्यातील पाणी निथळून एका स्वच्छ कपड्यात बांधून उबदार जागेत ठेवावेत.
दुसऱ्या दिवशी त्याला छान मोड येतात.
एका कढईत तेल टाकून मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी.
नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
त्यानंतर त्यात टोमॅटो पण छान परतून शिजवून घ्यावा.
लसूण आद्रक पेस्ट, हळद, तिखट व मसाला टाकावा.
नंतर त्यात मोड आलेल्या मेथ्या टाकून परतून घ्यावे व झाकण ठेवून छान वाफ आणावी.
वाफ आल्यावर त्यात भिजलेली मुगाची डाळ टाकावी व उसळ वाफेवरच शिजवून घ्यावी.
सर्वात शेवटी मीठ घालावे.
मेथ्यांची उसळ तयार.... कोथिंबीर घालून जेवायला वाढावी.
टीप: मधुमेहींसाठी ही उसळ अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे.
ही उसळ वाफेवरच शिजवावी त्यामुळे ती चवीला अजिबात कडू लागत नाही.
Comments