मिश्र भाज्यांचे थालीपीठ
- मंजुषा बेंडे
- Jan 8, 2021
- 1 min read
साहित्य :
ज्वारीचे पीठ - २ वाटी
बेसन - १ वाटी
किसलेले गाजर - १ वाटी
किसलेली काकडी - १ वाटी
बारीक चिरलेली कांद्याची पात - १/२ वाटी
हळद - १/२ चमचा
धने पावडर - १/२ चमचा
जिरे पावडर - १/२ चमचा
ओवा - १/२ चमचा
तिखट - २ चमचे
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर - १/४ वाटी कोथिंबीर
तेल - ३ चमचे
कृती:
प्रथम एका परातीमध्ये ज्वारीचे पीठ आणि बेसन एकत्र करून घ्यावे.
त्यात हळद,तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर,ओवा आणि कोथिंबीर टाकावी आणि मिश्रण कालवून घ्यावे.
नंतर त्यात किसलेली काकडी, गाजर आणि कांद्याची पात टाकून पीठ छान मळून घ्यावे.
मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करावेत आणि एका तव्यावर तेल लावून त्यावर थालीपीठ थापून घ्यावेत.
मध्यम आचेवर थालीपीठ दोन्ही बाजूने भाजून घ्यावेत.
गरमागरम खरपूस थालीपीठ तयार
हे थालीपीठ लोणी, तूप , दही किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता.

टिप : किसलेल्या काकडीच्या पाण्यातच थालीपीठाचे पीठ मळून घ्यावे. गरज असेल तरच अजून थोडे पाणी वापरावे.
Comments