top of page
  • श्री विनोद पंचभाई

नारायण - नागबली | संकल्पना - विधी



harivara.com

नारायणबली


मृत्युनंतर आत्म्याचे अस्तित्व हे गृहित धरलेले असते.हिंदुधर्मात जन्माचेप्रकार ८४ लक्ष आहेत असे मानतात.धर्म,अर्थ,काम,मोक्ष हे ४ पुरुषार्थ आहेत.जन्म-मरण जन्मानंतर मृत्यु,मृत्युनंतर जन्म या संकल्पनेचा मानस हिंदुधर्मात अपेक्षित नसतो.मृत्युनंतर पुनर्जन्म ही ईच्छा,हा संकल्प न ठेवता मोक्षाचि प्राप्ती अपेक्षित असते.म्हणजेच मृत जिवाला सद्गती लाभावी त्याचा पुढचा प्रवास सुरळित व्हावा असेच अपेक्षित असते.


अन्नमय व प्राणमय कोश निकामी झाल्यावर अंतःकरणासह म्हणजे मन,बुध्दी,अहंकार व चित्त या सर्वांसकट जीवात्मा बाहेर पडतो आणि कालांतराने नव्या गर्भात प्रवेश,अशा अनेक जन्ममरणांच्या यात्रेतुन मानवी जिवात्म्याची उत्क्रांती होते,तो अधिकाधिक शहाणा होतो.आणि अंततः मोक्षपदाला पोचतो.म्हणजेच जन्ममरणाच्या चक्रातुन कायमचा बाहेर पडतो,इतर सर्वकोशांसह जेव्हा कारणदेहहि गळुन पडतो तोच मोक्षाचा क्षण ठरतो.मृत्युसमयी एखाद्याच्या शुभ वा अशुभ वासना अति-तीव्र असतील तर त्या वासना मृत जीवात्म्याला स्वस्थ बसु देत नाहीत.त्यातुनच त्याच्या मृत्युनंतरच्या प्रवासाला गती येते व दिशा मिळते.


नेहमीच्या प्रक्रियेनुसार प्रथम प्राणकोश मग वासनाकोश नंतर मनःकोश गळुन पडतात.वासना व मन साररुप कारणदेहात साठवले जातात.त्यानंतर कारणदेहातील जिवात्मा पुढील जन्मायोग्य परिस्थितीची वाट पाहत थांबतो.पण या प्रक्रियेला वर्षानुवर्ष लागतात.


जिवात्माच्या मृत्युसमयी वासना अतितीव्र असल्या तर पिशाच्च्योनीत प्रवेश करतो.या भूतयोनीत वा पिशाच्च्योनीत असतांना कधी कधी कुठल्या तरी जिवित माणसाव्दारे तो वासना भोगतो.काही वर्षानंतर वासनाक्षय झाल्यावर जिवात्मा भूतयोनी सोडुन परत पुढील मार्गाला लागतो.


मृत्युनंतर वासनामय जिवात्मा भूतयोनीत न जाता कधी कधी पितृयोनीत थांबुन राहतो.व तिथुन तो आपल्या वंशजांच्या जिवनावर लक्ष ठेवतो.आणि त्यांच्या उत्कर्षापकर्षात स्वतःच्या वासना भोगतो.जिवात्म्याचे पितृलोकातील वास्तव्य काही वर्षांपुरतेच असते.त्यानंतर तो आपल्या पुढच्या प्रवासाला लागतो.


धर्मशास्त्रात ६६ प्रकारचे दुरमरणाचे प्रकार सांगितले आहे.मृत्यचे कारण आत्महत्या,खुन व अपघात अकालीमृत्यु असेल तर अशा व्यक्ती सर्वसाधारणपणे पिशाच्चयोनीत प्रवेश करतात.यांतील काही पिशाच्चे त्यांच्या तीव्रवासनेमुळे एखाद्याच्या मागे लागतात.आत्महत्या,खुन व अपघात यामुळे एखाद्या व्यक्तीस मृत्यु आल्यास ती व्यक्ती तिचे मानवदेहातील नियत आयुष्य संपेपर्यंत पिशाच्चयोनीत राहते आणि त्यानंतर परलोकाचा प्रवास सुरु करते.





अतृप्त आत्म्यांच्या मोक्षासाठी केला जाणारा विधी म्हणजे नारायणबली होय.कुळातील या जन्मी किंवा जन्मांतरी पुरुष किंवा स्त्रिया ज्या कोणी अतृप्त असतील त्यांना सद्गती मिळण्यासाठी हा विधी केला जातो.वासना अतृप्तराहिल्यामुळे पिशाच्चयोनित असलेल्या,पितृयोनित असलेल्या,वंशवृध्दीकरता प्रतिबंध करीत असलेल्या शरीरास बाधा उत्पन्नकरणार्‍या,कुलास उपद्रव करणार्‍या,मनातील शुभकामना पूर्ण होऊ न देणार्‍या अशा सर्व अतृप्त आत्म्यांच्या शापापासुन मुक्ततेसाठी हा नारायणबली विधी केला जातो.


नारायणबली कर्मामुळे अतृप्त आत्म्यांना मोक्ष मिळ्तो ही संकल्पना आहे.नारायणबली कर्मामध्ये नारायण हे नांव अतृप्त आत्म्याच्या समुदायाचे नांव संबोधले जाते.या कर्मामध्ये यजमानांच्या गोत्राचा व पितरांचा नामोच्चार केला जात नाही.या विधीमुळे अतृप्त आत्म्यांना पिशाच्चदोषापासुन,पितृदोषापासुन मुक्ती मिळते व घरातील सांसारिक सुखाच्या माध्यमातुन नारायणबलीचे फळ अनुभवास येते.संततीत वृध्दी होणे,घरातील मुलामुलींचे लग्नकर्य होणे,द्रव्यात वाढ होणे या सारख्या सर्व सुखांचा लाभ नारायण बली कर्मा मुळे होते.


नागबली





एतैत सर्पाः शिकंठ्भूषा लोकोपकाराय भुवं वहन्तः


भूतै समेता मणिभूषितांगाः गृण्हित पुजां परमां नमो वः।


कल्याणरुपं फणिराजमग्य्रं नानाफणा मंडलराजमानम


भक्त्यैकगम्यं जनताशरण्यं यजाम्यहं नः स्वकुला भिवृध्यै॥


सर्पदोषाच्या परिहाराकरिता केला जाणारा विधी म्हणजे नागबली होय.सर्पदोष हा अनेक कारणांमुळे ओळखला जातो.त्यातिल काही कारणे संतती नसणे,आरोग्य नसणे,विशेषतः वात,पित्त,त्रिदोषजन्य ज्वर,शूळ,उदररोग,गंडमाला,कुष्ठ,कंडु,मुत्रकुच्छ आदिरोगांमुळे सर्पबाधा आहे असे मानले जाते.


८४ लक्ष जन्मामध्ये नाग हा एक जन्म आहे.सर्पयोनी व मानवाचा अतिनिकटचा संबंध आहे.महाभारतात हा संबंध स्पष्ट दिसुन येतो.ब्रम्हदेवापासुन सप्तऋषी निर्माण झाले.त्यातील एक मरीची ऋषीचा काश्यप ऋषी या कस्प ऋषीला २ पत्नी होत्या.एकीचे नाव कद्रु व दुसरीचे नाव विनिता होते.कद्रुला सर्प झाले व विनिताला गरुड झाला.असा मानवाचा व नागाचा निकटचा संबंध आहे.


म्हणुनच शास्त्रीय दृष्ट्या दोघांचे उत्पत्तीशी साम्य आहे.योगशास्त्राप्रमाणे मानवी शरिरात असणार्‍या कुंडलिनीच्या जागृतीनेच देहाची साध्यता साध्य होते.या विषयाचे विश्लेषण आपल्या सर्वांचे आध्यात्मिक संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीत खुपच विस्ताराने केले आहे.


मुलाधार चक्रामध्ये पाठीच्या कण्यांच्या प्रारंभस्थानी कुंडलिनीच्या उत्थापनामुळेच मानवाला ब्रम्हज्ञान प्राप्त होते,म्हणजेच जीवत्मा ऐक्य होते.असा सिध्दांत आहे.मानवास मनुष्यत्व या कुंडलिनिनेच प्राप्त होते.मानवाचि वैज्ञानिक पूर्णता या कुंडलिनीच्या ज्ञानानेच होते.शास्त्रात कुंडलिनिला सर्प हि संज्ञा दिलेली आहे.म्हणुन कुंडलिनी अथवा सर्प या संज्ञा एकच आहेत असे मानले जाते.सर्पाची हत्या स्वतः या जन्मी किंवा जन्मांतरी केली असल्यास,ज्ञान असुन किंवा अज्ञानाने सर्प वध केला असल्यास सर्पदोष निर्माण होतो.


धनलोभात मृतायेच सर्प योनि व्यवस्थिता।


काही लोकांना अंत्यसमयी सुध्दा धनलोभ असतो.काहींच्या घरात जमिनीमध्ये धन असते.त्या धनावर नाग बसलेला असतो,असे बर्‍याच जुन्याघरांमध्ये पाहावयास मिळते.धनावर बसलेला नाग हा मागिल जन्मी त्या धनाचा मालक असतो असे साधारणतः मानले जाते.


अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलम।


शंखपाल धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा।


एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम।


सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः।


तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत॥


या स्तोत्रा वरुन असे म्हणता येईल,विजय देणारा नाग आहे.नागाच्या हत्येमुळे सर्पदोष निर्माण होतो.


सर्प दोषाच्या मुक्ततेसाठी नागबली विधी करण्याची प्रथा आहे.


नारायण नागबली विधी मध्ये केल्या जाणार्‍या कर्माचा क्रमः


सर्व प्रथम पापमुक्ततेसाठी देहशुध्दि विधीःतिर्थराज कुशावर्ता मध्ये स्नान करुन नूतन वस्त्र परिधान करावे लागतात.त्या नंतर आशुतोष राजाधिराज त्र्यंबकराजाचे दर्शन घेवुन विधीच्या संपूर्ण फल प्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते.


पितशाप मुक्ततेसाठी नारायण बलीःप्रधान संकल्प,न्यास,कलशपुजन,सूर्य पुजन,दिप पुजन,विष्णुपुजन,विष्णुतर्पण,ब्रम्ह,विष्णु,रुद्र,यम,तत्पुरुष,पंचदेवता पुजा,अग्निस्थापन,पुरुषसुक्त हवन,एकादश विष्णुश्राध्द,पंचदेवता श्राध्द,बलिदान,पालाश विधी,दशांत कर्म आदि कर्म नारायण बली विधी मध्ये केले जातात.नागबली मध्ये मौकोद्दिष्ठ श्राध्द,मासिक निवृत्ती श्राध्द,सपिंडी श्राध्द,प्रायश्चित्त संकल्प,नागबली संकल्प,प्राणप्रतिष्ठा पूर्वक नागाची पुजा व प्रार्थना,नागदहन आदि कर्म केले जातात.आणि २ दिवस सुतक पाळले जाते.


स्वस्तिपुण्याहवाचनःअशुभता निरसनार्थ गणपति पुजन केले जाते.सुवर्ण नाग पुजन केले जाते.त्र्यंबकेश्वरास अभिषेक आशिर्वाचनाने कर्म समाप्ती होते......




112 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Comments


bottom of page