top of page
श्री विनोद पंचभाई

नवग्रह जप


wikipedia


१. सूर्य-

ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हौं स: सूर्याय नम:

महत्त्व : कुंडलीमधील सूर्य ग्रहाची उत्तम स्थिती प्राप्तीकरिता जप व दान करावे. हवन करतेवेळेस शक्यतो रविवार तसेच हवनामध्ये रक्तचंदन अर्कसमिधा, तीळ आणि दही यांचा उपयोग करावा.


२. चंद्र-

ॐ श्रां श्रीं श्रौं स: सोमाय नम:

महत्त्व : कुंडलीमधील चंद्र गहाच्या उत्तम स्थिती प्राप्ती करिता सोमवारी जप करून हवन करावे. हवन करतेवेळी तूप, पायस, दही, मध आणि पळसाच्या समिधा यांचा विशेष उपयोग करावा.


३. मंगळ-

ॐ क्रां क्रीं क्रौं स: भौमाय नम:

महत्त्व : कुंडलीमधील मंगळ ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता मंगळवारी मंगळ ग्रहाचे हवन करावे. यामध्ये विशेषत: दही, मध, तूप, तीळ तसेच खैराच्या समिधांचा विशेष उपयोग करावा.


४. बुध

ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:

महत्त्व : कुंडलीमधील बुध ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता बुधवारी जप करून तूप, तीळ, आघाडा या वनस्पतींच्या समिधा वापरून हवन करावे.





५. गुरू

ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे नम:

महत्त्व : कुंडलीमधील गुरूची उत्तम स्थिती प्राप्तीकरिता अथवा गोचर कृपेने चार, आठ, बारा या स्थानी गुरू असता गुरुवारी गुरूचा जप करून हवन करावे. या हवनामध्ये विशेषत: पिंपळ वृक्षाच्या समिधा, मध, दही, पायस, तूप, जव आणि तीळ हे विशेष द्रव्य वापरून हवन करावे.


६. शुक्र:

ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:

महत्त्व : कुंडलीमधील शुक्र ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता, उत्तम वैभवप्राप्तीकरिता शुक्रवारी जप करून हवन करावे. यामध्ये विशेषत: दही, मध, तीळ व औदुंबर या वृक्षाच्या समिधांचा हवनामध्ये उपयोग करावा.


७. शनी

ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:

महत्त्व : कुंडलीमधील शनी ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता तसेच साडेसाती पीडाशमन होण्याकरिता शनिवारी जप करून हवन करावे. यामध्ये विशेषत: दही, मध, तूप, तीळ व शमी या वृक्षांच्या समिधांचा हवनामध्ये उपयोग करावा.


८. राहू

ॐ भ्रां भ्रीं भ्रौं स: राहवे नम:

महत्त्व : कुंडलीमधील राहू ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता रविवारी जप करून हवन करावे. हवनामध्ये विशेषत: पायस, तांदळाच्या साळी (लाह्या), तूप, मध व दूर्वा या समिधांचा उपयोग करावा.


९. केतू

ॐ स्त्रां स्त्रीं स्त्रौं स: केतवे नम:

महत्त्व : कुंडलीमधील केतू ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता रविवारी केतूचा जप करून हवन करावे. यामध्ये विशेषत: कुश (दर्भ), पायस, तीळ, तूप यांचा उपयोग करावा.




41 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Comments


bottom of page