top of page
  • श्री विनोद पंचभाई

आपल्या घरातील काही वस्तू कधी कुणाला देऊ नये.....

नमस्कार, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या घरातील या वस्तू आपण चुकूनही कोणाला देऊ नयेत. कारण या वस्तू थेट महालक्ष्मीशी संबंधीत असतात या वस्तूंवर माता लक्ष्मीचा प्रभाव असतो. जेव्हा आपण या वस्तू दुसऱ्या एका व्यक्तीस देतो तेव्हा या वस्तूंसोबत माता लक्ष्मी सुद्धा आपलं घर सोडून जाते. आणि आपल्या हातून घडलेल्या चूकीमुळे महालक्ष्मी चा प्रवेश आपल्या घरात होत नाही.


dreamtime.com

महालक्ष्मी आपल्या घरात कधीही येत नाही. परिणामी आपल्या घरातील धन निघून जात. आणि घरात हळू हळू गरीबी येऊ लागते. मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा एखादी व्यक्ती राजा बनते तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठीशी महालक्ष्मी ची कृपा असते. या जगात जेवढे श्रीमंत, धनी लोक आहेत ते लोक अत्यंत आवडीने महालक्ष्मीची पूजा करतात. आणि त्यांच्यावरती लक्ष्मीची कृपा वसते आणि म्हणूनच त्यांच्या जवळ पैसे ठिकून आहे.


विष्णू पुराण मध्ये एक उल्लेख असा आढळतो की एकदा महालक्ष्मी स्वर्गातील देवतांवर्ती दृष्ट होऊन वैकुंटी निघून गेल्या. आणि त्याच्या परिणामी त्या स्वर्गलोकामध्ये गरीबी निर्माण झाली आणि देवी देवतांच्या अंगावरील सर्व आभूषणे, अलंकार हे लुप्त झाले. जेव्हा महालक्ष्मी एखादे स्थान त्याग करते एखादे ठिकाण सोडून जाते तेव्हा त्या ठिकाणी दारिद्र्यचा वास निर्माण होतो. आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील महालक्ष्मीच्या संबंधित या वस्तू कोणालाही देऊ नयेत. चला तर पाहुयात या वस्तू कोणत्या आहेत.


मित्रांनो जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे पोळपाट आणि बेलने…होय अनेकांना या गोष्टी बद्दल माहिती नसत. अनेक घरांमध्ये अशी प्रता दिसून येते की एकमेकांना पोळपाट दिले जाते. तर मित्रांनो पोळपाट आणि बेलने ही एक अशी वस्तू आहे ही एक अशी जोडी आहे की जे आपण कोणालाही देऊ नये. कारण या वस्तू चा थेट संबंध माता लक्ष्मीशी आहे. या वस्तू ची देवाण घेवाण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊ शकते. मित्रांनो आपल्या घरात जे अन्न शिजत जी भाकरी, चपाती, खातो ते तयार करण्याचं काम हे पोळपाट बेलने करत असत. आणि जेव्हा आपण हे आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीलाच बाहेर पाठवतो तेव्हा मित्रांनो अन्नपूर्णा तर रुष्ट होतेच पण सोबतच अश्या घरात कधीच राहत नाहीत.


दुसरी वस्तू आहे ती आहे तवा…होय ज्यावरती आपण चपाती भाजतो असा तवा सुद्धा माता लक्ष्मीशी थेट निगडित समजला जातो. या तव्या संबंधी वास्तुशास्त्र मध्ये अनेक नियम सांगितले आहेत. तिसरी जी वस्तू आहेत त्या आहेत दूध असेल दही असेल तांदूळ असेल धन असेल मित्रानो या वस्तू सूर्य मावल्यानंतर आपण एखाद्या बाहेरील व्यक्तीला दूध देतो, दही देतो, तांदूळ देतो, किंवा धन देतो तेव्हा या वस्तूंच्या प्रभावाने माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते.


लक्षात घ्या सूर्यास्ता नंतर अनेक लोक तंत्र मंत्र करतात आणि तुमच्या घरात सगळं काही सुरळीत चालू असेल सर्व मंगल असेल तर या वस्तू बाहेर दिल्याने आपल्या कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ शकतो कुटुंबातील शांती भंग पावते. आणि हळू हळू घरातील पैसे बाहेर होऊ लागतो. आणि म्हणून या चार वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सूर्यास्ता नंतर धन किंव्हा पैसे कोणालाही उधार देऊ नका.


आणखीन एक गोष्ट म्हणजे सूर्यास्त असो किंवा सूर्योदय असो आपण आपल्या नातेवाईकांना पैसे कधीच उधार देऊ नका. अस केल्याने नाती तुटतात. नात्यांमधील प्रेम समाप्त होत. आणि अश्या व्यक्तीला चुकूनही पैसे देऊ नका की जो व्यक्ती आपल्याकडून घेतलेलं पैसे हे एखाद्या चुकीच्या कामामध्ये दुष्कर्मामध्ये त्या पैसेचा वापर करत आहे. लक्षात घ्या तुमची लक्ष्मी अश्या अधर्मी कामात उपयोगी येऊ लागली तर त्याच पाप हे त्या केवळ व्यक्तीलाच नव्हे तर तुमच्या सुद्धा माती निर्माण होऊ शकत. तुमच्याही पदरात हे पाप पडू शकत.


70 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Comentarios


bottom of page