पापड भाजी
- Akanksha Bende
- Jan 15, 2021
- 1 min read
साहित्य:
बारीक चिरलेला टोमॅटो - १
बारीक चिरलेला कांदा - १
धने पावडर - १/२ चमचा
जिरे पावडर - १/२ चमचा
काळा मसाला - १ चमचा
हळद - १/२ चमचा
तिखट - १ चमचा
आद्रक लसूण पेस्ट - १ चमचा
मीठ - चवीनुसार
जीरे - १/२ चमचा
मोहरी - १/२ चमचा
पाणी - १ ग्लास
पापड - ३ -४
तेल -१ चमचा
कोथिंबीर

कृती:
प्रथम कढईत तेल गरम करून जिरे मोहरीची फॊडणी करून घ्यावी.
त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा.
नंतर आद्रक लसूण पेस्ट टाकून छान परतून घ्यावे.
त्यात टोमॅटो टाकून टोमॅटो शिजेपर्यंत झाकून ठेवावे.
त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, हळद, तिखट, मीठ, काळा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
नंतर गरम पाणी घालून रस्सा उकळून घ्यावा व नंतर त्यात कोथिंबीर घालावी.
वाढण्यापूर्वी ५ मिनिटे त्यात पापडाचे तुकडे टाकावेत. ( पापड कच्चा, भाजलेला किंवा तळलेला तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता.)
पापड भाजी तयार
Comments