साहित्य:
========
तुरीची डाळ दोन वाट्या
मेथ्या एक चमचा
तिळाचा कूट एक चमचा
शेंगदाण्याचा कूट एक मोठा चमचा
खोबरा कीस एक मोठा चमचा
कारळाचा कूट दोन मोठे चमचे
मीठ
धण्याची पूड एक चमचा
जिऱ्याची पूड एक चमचा
तिखट, काळा मसाला प्रत्येकी दोन चमचे
फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, लसूण पाकळ्या, लाल सुक्या मिरच्या
=========
कृती:
==========
तुरीची डाळ कुकरमध्ये छान शिजवून घ्यावी. शिजवतानाच त्यात मेथीचे दाणे, हळद घालावी. शिजल्यावर छान घोटून घ्यावी. कढईत तेल घालून त्यात जिरे, मोहरी, हिंगाची खमंग फोडणी करावी . त्यात वरण पातळ करून टाकावे. एका छोट्या भांड्यात कारळाची कूट, तिळाची कूट, शेंगदाण्याची कूट, खोबऱ्याचा कीस, धन्याची पूड, जिऱ्याची पूड, काळा मसाला, मीठ टाकून सगळे मिश्रण एकत्र करावे. वरण उकळत आले की त्यात हे मिश्रण टाकून वरण छान हलवून घ्यावे. वरण थोडेसे दाटसर होत आले की गॅस बंद करावा. एका छोट्या कढईत फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल टाकावे. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढिपत्त्याची पाने, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे टाकावे तसेच लसूणाचे बारीक तुकडे करून ते लाल होईपर्यंत तळावेत. फोडणी तयार झाली की वरणावर टाकावी. आवडत असेल तर थोडी फोडणी बाजूला ठेवून पेंडपाला ताटात वाढल्यावर टाकावे.
टीप: हा पेंडपाला भाकरीसोबत खाल्ल्याने या पदार्थाची लज्जत वाढते.
===========
Comments