top of page
  • श्री विनोद पंचभाई

वसुबारस

वसुबारस आजि असे करुया

प्रेमभरे गाईचे पूजन

सवत्स धेनू दारी आली

सांभाळू आपण आपले गोधन


श्रीकृष्ण सांभाळी गोमातेला

दत्ताचरणी आश्रय दिधला

कामधेनू म्हणती भक्त तिजला

पुरवी सर्वांच्या मनोकामनेला


गोमूत्राची महती वर्णितो

आयुर्वेद घ्यावे पंचगव्य हो

धार्मिक कारणे रोग निवारणे

प्यावे शरीर शुद्धी हो


नैवेद्य दाखवू आरती करुया

गाई वासराचे महत्त्व सांगू

वसुबारसेचे महत्त्व जाणून

गोवत्सांचे रक्षण करु


वसुबारस


अश्विन कृष्ण द्वादशीला

वसुबारस सांगत आली

दिवाळीची सुरुवात झाली

सवत्स धेनु आज ओवाळी


घरी-दारी आली दिवाळी

अंगणी काढा आज रांगोळी

पूजा गोमातेची सायंकाळी

नैवेद्य भरवून पुरणपोळी


आरोग्य वसु मिळे सर्वदा

कृष्णरूप गाऊली पूजिता

कपिला जणू शेतकऱ्याची

समृद्धी देईल मनी इच्छिता


वसुबारस सण गाय वासरांचा

पशुधन वाढवा श्वेतक्रांती घडवा

दूध पूर्णान्न असे अमृत ठेवा


11 views0 comments

Recent Posts

See All

विज्ञान आणि अध्यात्म यातील फरक

1. विज्ञान प्रयोगातून विकसित होते, अध्यात्म योगातून प्राप्त होते. 2. विज्ञानासाठी साधने वापरली जातात, अध्यात्मासाठी साधना वापरली जाते. 3....

माणसाला देव हवा पण कशासाठी?

माणसाला हवा सदा आनंद, पण देवाला देतो काही सेकंद. विषयांमध्ये जातो गढून, देवाची आठवण अधून-मधून. प्रपंच करतो आवडीने, परमार्थ मात्र सवडीने...

Comments


bottom of page