top of page
सौ.साधना लाठकर

पुडचटणी

Updated: Jan 16, 2021




साहित्य -


हरभरा डाळ - १ १/२ वाटी

उडिद डाळ - १ वाटी

तीळ - १ वाटी

धने - १ वाटी

किसलेले खोबरे - १ वाटी

चिंच - १ वाटी

गूळ - १ वाटी

तिखट - १/२ वाटी

मीठ - चवीप्रमाणे

जीरे - १/२ चमचा

मेथ्या - १/२ चमचा

तेल - १ वाटी



कृती-.


  • हरभरा डाळ, उडिद डाळ, तीळ, धने व खोबऱ्याचा किस हे सर्व जिन्नस वेगवेगळे मंद आचेवर खमंग भाजून घ्यावेत.

  • भाजलेले सर्व जिन्नस मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावेत.

  • चिंच स्वच्छ धुवून घ्यावी आणि गूळ व चिंच मिक्सरमधून चांगले एकजीव करुन घ्यावे .

  • १/२ वाटी तेल गरम करून त्यात तिखट परतून घ्यावे.

  • नंतर भाजलेले जिन्नस, चिंचगुळाचे मिश्रण आणि तिखट एकत्र करून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे व चटणी मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यावी.

  • मेथ्या व जिरे टाकून फोडणी करावी व फोडणी थंड झाल्यावर चटणीमध्ये कालवून घ्यावी.

  • पुडचटणी तयार

128 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page