top of page
सौ.श्वेता गिरधारी- देशपांडे

पुरणपोळी

साहित्य :


हरभऱ्याची दाळ - १ कप

हळद - पाव चमचा

गूळ - १ कप (किसलेला)

गव्हाचे पीठ-१ कप

मैदा-१ कप

मीठ- पाव चमचा

तेल -1 चमचा ( पीठ मळण्यासाठी)

जायफळ पूड -पाव चमचा

वेलची पूड- पाव चमचा

पाणी -२ ग्लास

तूप (पोळी भाजताना लावायला)



कृती :

  • हरभऱ्याची दाळ स्वच्छ धुवून ३-४ तास भिजवून ठेवावी.

  • त्यानंतर कुकरमधे हरभऱ्याची दाळ पाणी व पाव चमचा हळद घालून मध्यम आचेवर 3-4 शिट्या करून शिजवून घ्यावी.

  • गव्हाचे पीठ व मैदा एकत्र करून त्यात मीठ घालावे व सैलसर कणीक भिजवून घ्यावी.

  • तेल लावून ती कणिक किमान अर्धा तास झाकून ठेवावी.

  • कुकर थंड झाल्यावर दाळीमधले उरलेले पाणी गाळून घ्यावे व दाळ चमच्याने चांगली एकजीव करून घ्यावी.

  • नंतर त्यात गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व गॅसवर मिश्रण चांगले घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यावे.

  • पुरण शिजत असतानाच त्यात जायफळ पूड व वेलची पूड मिसळावी.

  • पुरण थंड झाल्यावर कणकेची छोटी पारी लाटून घेऊन त्यात पुरण भरावे.(मोदकात सारण भरतो त्याप्रमाणे) व जास्त जोर न देता पोळी लाटावी.

  • दोन्ही बाजूने तूप लावून पोळी खरपूस भाजून घ्यावी.

  • पुरणपोळी तयार आहे.


टिप :- हरभऱ्याची दाळ भिजवून ठेवल्यामुळे छान मऊ शिजते .त्यामुळे मिक्सरमधून किंवा पुरणपात्रातून काढायची गरज भासत नाही आणि वेळ वाचतो.


Recent Posts

See All

Comments


bottom of page