top of page
  • श्री विनोद पंचभाई

पुरुषसूक्त

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नव्वदावे जे सूक्त, तेच "पुरुषसूक्त" होय..! एकंदर सोळा ऋचा यात समाविष्ट आहेत. या सूक्ताचा कर्ता नारायण ऋषी आहे. पुरुषसूक्त हे नांव वेदातील नाही. ब्रम्हकर्मात या ऋचांचा वापर सुरू झाल्यावर याज्ञिकांनी त्यांना "पुरुषसूक्त हे नांव दिले.


pinterest




हजारो मस्तके, हजारो नेत्र व हजारो पाय असणाऱ्या पुरुषरूप परमात्म्याने हे सारे विश्व व्यापले आहे. शिवाय तो पुरुष दहा बोटे शिल्लक उरला आहे. हे सारे विश्व ईश्वररूप आहे. भूतकाळीजे होते, वर्तमानकाळी जे आहे, भविष्य काळी जे असेल, ते सर्व पुरुषमय आहे. या पुरुषापासूनच विश्वाची निर्मिती झाली. या आदिपुरुषानेच आपल्यापासून दुसरे देव, मानव इत्यादी उत्पन्न केले. ह्या पुरुषाला हवी कल्पून देवांनी आणि ऋषींनी यज्ञ सुरू केला. या यज्ञापासून पशु-पक्षी आणि नानाविध प्राणी निर्माण झाले.


या विराट पुरुषाच्या मनापासून चंद्र, नेत्रापासून सूर्य, श्वासापासून वायु, नाभीपासून अंतराळ, मस्तकापासून द्युलोक, पायांपासून भूमी व कानांपासून दिशा निघाल्या. हा पुरुष शास्त्रोक्त कर्म करणाऱ्यांना त्यांच्या चित्तशुध्दीद्वारा मोक्ष प्राप्त करून देतो. ह्या पुरुषाचे दुसरे नांव आहे, "परमात्मा." पुरुषसूक्तात हे सर्व आले आहे.


नारायण ऋषीने वर्णिलेला पुरुष हा ईश्वर आहे. ईश्वरासंबंधी नारायण ऋषीने केलेल्या प्रदीर्ध चिंतनाचा आणि त्या महान् तत्वज्ञानाचा अविष्कार "पुरुषसूक्ता" त झाला आहे. हे सारे विश्व ईश्वरमय असल्याचे नारायण ऋषींना भासले. ईश्वर आणि जगत् एकरूप आहे. ईश्वर अनंत आहे, अपार आहे, असे नारायण ऋषी सांगतात.


यज्ञ हा सर्वात पहिला धर्म होता, हे नारायण ऋषींच्या या "पुरुषसूक्ता" द्वारे कळते. कोणकोणत्या गोष्टींची निर्मिती यज्ञापासून या पृथ्वीतलावर झाली, ते नारायण ऋषींनी कथन केले आहे. अद्वैत तत्वज्ञान व अद्वैत भक्तिमार्ग यांना प्रेरणा देणारे असे हे आदरणीय, परममंगल सूक्त आहे. "पुरुषसूक्त" हे विश्वचालकाचे स्तूतीरूप आहे. प्राचीन काळी "पुरुषसूक्त" उपनयनादी संस्कार झाल्यावर द्विजत्व पावलेल्या युवकांना मुखोद्गत करावे लागत असे.


स्नान केल्यावर "पुरुषसूक्त" शांतचित्ताने दररोज पठण करावे. तदनंतर "विष्णूसूक्त" म्हणावे. असा प्रघात आहे. भगवान सूर्यनारायणाच्या अपेक्षित वरदानाची प्राप्ती करून घेण्यासाठी"पुरुषसूक्ता" तील सहाव्या ऋचेतील (वसन्तो स्यादीदा) मंत्राने यज्ञात तुपाची आहुती द्यावी. याच्या पाठाने महापातकांचा नाश होतो. सर्व पातकांचा नाश होण्यासाठी एक महिना "पुरुषसूक्ता" चा पाठ करावा.


मौल्यवान वस्तूची प्राप्ती होण्यासाठी श्रावण महिन्यात चांद्रायण व्रत करून शुध्द झालेल्याने "पुरुषसूक्ता" चा दररोज एक पाठ करावा. याच्या नित्य पठणाने सर्व इच्छा फलद्रुप होतात. इतकेच नव्हे, तर पठणकर्त्याचा भाग्योदयही निश्चितपणे होतो.


षोडशोपचार पूजा "पुरुषसूक्ता" तील १६ ऋचांच्या सहाय्याने केली जाते. एक एक ऋचा ही पूजेतील एक एक उपचार आहे. अभिषेकाचे वेळी "पुरुषसूक्त" म्हणण्याचा प्रगाध आहे. तिन्ही वेदात या सूक्ताचा समावेश असून हे हिंदू धर्मियांच्या उज्वल परंपरेचे प्रतिक आहे.




66 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Comments


bottom of page