मोक्ष मिळणे इतके सोपे नाही! कर्म बंधन खूप जबरदस्त असते.
उदाहरणार्थ : वामन अवतारात बळीराजाची मुलगी तिथे होती. तिला ते बटु वामनाचे तेजस्वी रूप पाहून हे माझे बालक असावे व मी याला दूध पाजावे ही तीव्र इच्छा मनात आली. त्याचवेळी वामनाने बळीराजाला पाताळी घातले. त्या मुलीच्या मनात क्षणभरात विचार पालटले! या बालकाला मी विष पाजून मारेल! बस याच दोन्ही इच्छा तिच्या श्रीकृष्ण अवतारात पूर्ण झाल्या ते पुतना या रूपाने! एकाच वेळी स्तनपान व विष आणि कर्मबंधनातून सुटका व मोक्ष! पण वामनावतार चौथा तर श्रीकृष्ण आठवा म्हणजे चार अवतार वाट पहावी लागली तिला या कर्मबंधनातून सुटका करून घेण्यासाठी!
केवळ एका इच्छेने इतके काही घडत असेल तर आपल्या इच्छांचा विचार केला तर मोक्ष मिळायला कोट्यावधी जन्म घेतले तरी कमीच पडतील.
आपल्या तर क्षणाक्षणाला किती आणि काय काय इच्छा मनात निर्माण होतात.
आणि या इच्छा अतृप्त राहील्या की पुन्हा पुन्हा जन्म मिळत राहतो म्हणूनच इच्छा तृप्त करण्यापेक्षा इच्छा न धरणे हेच मोक्षाचे साधन आहे इच्छा आहेत तोपर्यंत कर्मबंधन आहे जन्म आहे.
Kommentare