top of page
  • सौ. श्वेता गिरधारी - देशपांडे

उपवासाचे साबुदाणा वडे आणि चटणी

साबुदाणा वड्यासाठी साहित्य:


भिजवलेला साबुदाणा - २ वाट्या

उकडलेले बटाटे-2 मोठे

शेंगदाण्याचा कूट - 3 चमचे

तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल

मीठ चवीनुसार

जिरे -१ चमचा

१०-१२ हिरव्या मिरच्यांची पेस्ट


कृती:-

  • प्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून ७-८ तास भिजवून ठेवावा.

  • नंतर भिजवलेल्या साबुदाण्यामधे जिरे, शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरचीचे वाटण,मीठ,बटाटे कुस्करून टाकावेत व मिश्रण एकजीव करून घ्यावे.

  • नंतर मिश्रणाचे छोटे गोळे करून चपटे वडे तयार करून घ्यावेत व गरम तेलात खरपूस तळून घ्यावेत.




चटणीसाठी साहित्य :-

किसलेली काकडी -१ छोटी

हिरवी मिरची - २ (बारीक चिरलेली)

शेंगदाण्याचा कूट - २ चमचे

फोडणीसाठी तेल

जिरे - पाव चमचा

दही -३-४ चमचे

साखर-पाव चमचा

मीठ चवीनुसार



कृती:-

  • एका भांड्यात काकडीचा किस घेऊन त्यात शेंगदाण्याचा कूट, मीठ व साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे .

  • नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या व जिरे घालून तडतडू द्यावे व ही फोडणी चटणीवर टाकावी.

  • साबुदाणा वडे व चटणी खाण्यासाठी तयार आहे.


टिप : साबुदाणा थोडा भाजून नंतर भिजवावा. त्यामुळे वडा तळताना फुटत नाही.


Recent Posts

See All

Comentarios


bottom of page