झटपट बनवा लाल टोमॅटोची हिरवी चटणी
- Akanksha Bende
- Dec 22, 2020
- 1 min read
साहित्य:
१ मोठा टोमॅटो , ५- ६ लसूण पाकळ्या, ८ -१० मिरच्या, कोथिंबीर, चमचा जिरे , चवीनुसार मीठ, तेल फोडणीपुरते

कृती:
कढईत जिऱ्याची फोडणी करून त्यात चिरलेला टोमॅटो, लसूण आणि मिरच्या ५ मिनिटे वाफवून घ्यावात. त्यात मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालून सगळे जिन्नस एकत्र मिक्सरमधे वाटून घ्यावे. झणझणीत तिखट, खमंग आणि थोडी आंबट हिरवी चटणी तयार.

Comments