बहूगुणी तुळस
- Akanksha
- Dec 9, 2020
- 1 min read
Updated: Dec 21, 2020
तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आणि पोषकतत्व असतात. तुळशीला आयुर्वेदात विशेष मह्त्व दिले आहे. आयुर्वेदात तुळशीच्या प्रत्येक भागाला म्हणजेच मूळ,फांद्या, पाने आणि बिया यांना महत्त्व आहे.
तुळशीमध्ये Anti-inflammatory, antifungal, antioxidant, antiallergic , antidisease properties असतात.

* दैनंदिन जीवनात तुळशीचे काही फायदे :
1. तुळशीचा रस खाज, खरूज, चट्टे, त्वचा विकार यांवर उपयुक्त आहे.
2. तसेच जखम झाल्यास, पिंपल्स, काळे डाग याकरिता तुळशीचा रस लावल्याने आराम मिळतो.
3. डोकेदुखी, केस गळणे , केस पिकणे, कोंडा होणे यासाठी तुळशीचा अर्क परिणामकारक ठरतो.
4. तुळशीचा अर्क चेहऱ्यावर लावण्याने चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स निघून जातात आणि चेहऱ्यावर चमक येते.
5. घसा दुखत असेल किंवा घसा बसला असेल तर गरम पाण्यात तुळशीच्या अर्काचे ८-10 थेंब घालून गुळण्या कराव्यात.
6.दात दुखत असतील तर कोमट पाण्यात तुळशीच्या अर्काचे थेंब घालून गुळण्या कराव्यात त्याने दात दुखी थांबते तसेच तोंडातील दुर्गंधी पण कमी होते.
7. कान दुखत असल्यास तुळशीचा रस थोडा कोमट करून १- २ थेंब कानात घातल्यास आराम मिळतो.
8. नाकातून रक्त येत असेल तर तुळशीच्या रसाचे काही थेंब नाकात घालणे फायद्याचे ठरते.
9. रोज तुळशीचे थेंब घालून पाणी सेवन केले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते.
10. तसेच तुळशीची पाने खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
11. तुळशीची पाने, आले आणि ज्येष्ठमध यांचा काढा पिल्याने सर्दी, खोकला आणि तापामधे आराम मिळतो.
12. तुळशीची पाने कुटून मधसोबत घेतल्याने कफ कमी होतो.
--संकलित माहिती
Comments