top of page
  • श्री विनोद पंचभाई

श्री तुलसी विवाह माहिती

आज कार्तिक मास शुद्ध ११/१२, या दिवशी चातुर्मास्य समाप्तीच्या दिवशी तुलसी विवाह काल सुरु होत आहे. त्यानिमित्ताने तुळशीबद्दल काही माहीती:-


सर्वप्रथम मी या परमेश्वराला तुल्य-सी असलेल्या म्हणजे जिची तुलना परमेश्वराशी होऊ शकते अश्या तुलसीदेवतेला मन:पूर्वक नमस्कार करून आपल्याशी संवाद साधतो.


तुळस


तुळशीची आजच्या शास्त्रीय भाषेतील वेगवेगळ्या प्रजातीनप्रमाणे वेगवेगळी नावे आहेत.

श्वेततुळस [पांढरीतुळस] - Ocimum Sanctum ,

कृष्णतुळस [काळीतुळस]- Ocimum Dilosum ,आणि तिसरी एक प्रजाती आहे तिला Ocimum Tenuiflorum असे म्हणतात.



namastegod.com


संस्कृतमध्ये तुळशीची तिच्या उपयोगा नुसार, उत्पत्तीस्थानानुसार आणि इतर अनेक गुणधर्मांनुसार वेगवेगळी नावे आहेत. तीअशी.


१) ग्राम्या - गावात, सर्वत्र होणारी,

२) सुलभा - सहज मिळणारी,

३) सुरस आणि सुरसा - चांगल्या रसाची,

४) सुभगा - कल्याणकारी,

५) भुतेष् आणि भूतप्रीया - सर्वप्राण्यांना आवडणारी,

६) पुतपत्री - जिची पाने खाल्ल्याने शरीर पवित्र होते,

७) सूरदुंदुभी आणि देवदुंदुभी - जिच्या पानांमध्ये देव रहातात,

८) अपेतराक्षसी - राक्षसांचा म्हणजेच कीटक [डास], जंतूंचा नाश करणारी,

९) कायस्था - शरीरस्थिर, दृढ करणारी,

१०) सुरभी, स्वादुगंधा - सुगंध असणारी,

११) वृंदा - वृंदानावाची एक राक्षसपत्नी विष्णूच्या वरदानाने पृथ्वीवर अवतरीत झाली म्हणून तसेच तिच्यावर एकत्रित फुले लागतात म्हणून वृंदा.

तसेच आपल्याला नावावरून सहज अर्थ कळेल अशीही काही नावे आहेत - पावनी, पापघ्नी, तीव्रा, सरला, त्रिदशमंजरी, मंजरी, सुमंजरी, बहुमंजरी, त्रिदशमंजरी, वैष्णवी, विष्णूवल्लभा, विष्णुप्रिया, हरिप्रिया, कृष्णप्रिया वगैरे....


इंग्रजीत तुळशीला ती डास नष्ट करत असल्याने "मस्कीटोप्लांट" सुद्धा म्हणतात तसेच ती पवित्र असल्याने "होलीबसिल" असेही म्हणतात.

तुलसीपत्रसहितंजलंपिबतियोनर: ! सर्वपापविनिर्मुक्तोमुक्तोभवतीभामिनी !! असा तुळशी बद्दल उल्लेख आढळतो. याचा अर्थ तुळशीची पाने घातलेले पाणी पिणारे सर्वरोगांपासून मुक्त होतात.


ज्यात फुले निर्झराच्या स्वच्छ पाण्यात बुडवून ठेऊन सुर्प्रकाशात ठेवल्यावर फुलातील गुणधर्म त्या पाण्यात उतरतात हे त्यांच्या लक्षात आले. अशा ३८ फुलावर संशोधनकरून त्यांनी वेगवेगळ्या मानसिक विकारांवर औषधे शोधून काढली. त्यांची ज्ञानेंद्रिये इतकीसंवेदनाक्षम झाली होती की त्यांनी त्या त्या फुलाची पाकळी जिभेवर टाकल्यावर त्यांना त्यामुळे शरीरात झालेले बदल लगेच लक्षात येत असत. या बाखफ्लॉवर औषधांनी लाखो लोक मानसिकत्रास, अपघात, दुर्दैवीमृत्यूनंतरच्या धक्क्यातून सावरलेले आहेत.

असो.


तर हेच तत्व हिंदुंच्या पूजेत वापरले गेले आहे. पूजेच्या वेळेला तीर्थामध्ये दुध, मधासहित तुळस, दुर्वा देखील असतात. गणेश उपासना करता उष्णता आणि पित्तवाढत असल्याने ते शमण्यासाठी दुर्वांचे तीर्थ किंवा रस, शंकर किंवा शिवउपासना करताना वात वाढत असल्याने [किंवा वात वाढल्यावर] बेलाचे तीर्थ किंवा रस आणि विष्णू किंवा नारायणाची [नार + आयन किंवा अयन अर्थात पाण्याचा किंवा पाण्यातील देव. पाणी हे सोम + अग्नी या दोन देवतांनी बनलेले आहे किंवा पाण्यात अग्नी असतो असे उल्लेख आहेत हे सोम म्हणजे ऑक्सिजन आणि अग्नी म्हणजे हायड्रोजन. पाण्यातील एलेक्ट्रोंस आणि प्रोतोंसत्यांच्या भारस्वरूपात विहरूलागल्यावर त्यांना आयन असेच म्हंटले जाते.] कफ वाढत असल्याने तुळशीचे तीर्थ किंवा रस वापरणे उपयुक्त असल्याने वैदिकधर्मात धर्माच्यामाध्यमातून यागोष्टी अगदी सामान्यातीलसामान्य माणसापर्यंत पोहोचविल्या गेल्या, ज्या अगदी स्वस्त किंवा बिनपैशाच्या आहेत.


तुळस

काही संशोधकांच्या अभ्यासानुसार तुळस हीच एक वनस्पति अशी आहे की जी "ओझोन" [O३] बाहेर टाकते. सध्या म्हंटल्या जाणार्या ग्रीनहाउस इफेक्टनुसार पृथ्वीवर आलेल्या सूर्यप्रकाशातील थर्मलइन्फ्रारेडकिरण वाजवीपेक्षा जास्तप्रमाणात येथील भयानक प्रदूषणामुळे धरून ठेवले गेल्याने पृथ्वीचे तापमान प्रचंडप्रमाणात वाढत आहे. आणि त्यामुळे बर्फ़ाच्छादित पर्वतावरील बर्फ वितळून हे पाणी समुद्रात मिसळून समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि फ्रीजसारख्या उपकरणांमुळे अर्थात त्यात वापरल्यागेलेल्या CFC सारख्यारसायनांमुळे वातावरणाच्यावरील ओझोनचाथरही विरळ होत चालला आहे. आणि यानिर्माणझालेल्या मोठ्या जागेतून सूर्यप्रकाश अजूनतीव्रतेने पृथ्वीवर येतो आहे. आपणअंगावरजे Body स्प्रे मारतो त्यामुळे शरीराभोवतीचा ओझोन कमी होतो. यासर्वांवर बिनखर्चिक आणि सोपा उपाय म्हणजे तुळस लावणे होय. तुळशीला सकाळी मायभगिनी पाण्याचे अर्घ्य देऊन नमस्कार करून प्रदक्षिणा करतात. त्यामुळे पाण्यातून परावर्तीत झालेल्या सूर्यप्रकाशातील ७ रंग त्या स्त्रीच्या शरीरावरपडून तिला त्याचा फायदा होतो. तसेच तुळशीच्या वासाने मन प्रफुल्लीत होते. हवा तुळशीने शुद्ध तर झालेलीच असते. त्याचाही लाभ होतो.

प्र + दक्षिणेचा सुद्धा लाभ होतो.

प्र म्हणजे पुढे जाणे आणि दक्षिणा म्हणजे आपल्या उजव्या बाजूने. सारे सौरमंडळ, ग्रह, तारे, आकाशगंगा, अणु, रेणू सारेसारे फिरत आहेत. त्यामुळे जगाची निर्मिती, स्थिती आणि पोषण चालू आहे. तर मग आपणही जर आपल्याला पूज्य असलेल्या देव, गुरु किंवा वनस्पती आणि प्रतीका भोवती जर फिरलो म्हणजेच प्रदक्षिणा केली तर आपलेही जीवन सुलभ, आनंदी आणि सुखमय होईल.

ग्रहणकाळामध्ये अन्न आणि पाणी दुषित होऊ नये म्हणून त्यावर तुळशीची पाने ठेवतात.

मृतव्यक्तीच्या मुखात गंगाजल आणि तुळस घालतात.....

दोन्हीही जंतुघ्न असल्याने...

तुळशीतून उडणारे यलो ओईल हे हवा शुद्धही करते आणि डासांना पळवूनसुद्धा लावते.

इथे अजून एक गोष्ट सांगावीशीवाटते की खूप पूर्वी माझ्या एक गोष्ट वाचनात आली होती तीम्हणजे पुण्याजवळील NCL Laboratory ला तुळशीच्या पानात "सोन्याचा" अंश आढळून आला होता. कदाचित त्यामुळेच रुक्मिणीने श्रीकृष्णाची सुवर्णतुला करताना तुळशीचे एक पान सोन्याच्या पारड्यात टाकले असावे.


कथा :-


दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशीचे लग्न लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणात आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती. पुढे, देव व दैत्य यांच्यांत युध्द होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपट कारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली.


तुलसी स्तोत्र


तुलसी सर्व प्रतांना महापातक नाशिनी | अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सम || सत्ये सत्यवतीचैव त्रेतया मानवी तथा | द्वापारे चावतीर्णासि वृंदात्व तुलसी क्ली: ||


विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली. इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले ! वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडून दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडले ! त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ठ भक्षण केले. विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले; इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेड्यासारखा बसून राहिला. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे, वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातून तेथे तीन झाडे उत्पन्न झाली. त्यांतील तुळस ही आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली. श्रीविष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात.


पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुध्द द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी - कृष्ण विवाह तुलसी विवाहविधीच्या रूपाने त्या दिवशी दरसाल साजरा करतात. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनात ऊस पुरून आवळे व चिंचा टाकतात. तुळशीच्या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्रीबाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन करून त्यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज, तसेच नैवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशीमातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून, तिला सौभाग्यलेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुसर्या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्ये अंतरपाट धरला जातो. मग सर्वांना अक्षता वाटल्या जातात. त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर श्रीकृष्ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो. प्रहर रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर मांडवाभोवती (जो वृंदावनाभोवती ऊस रचून केलेला असतो) आरती, दीपाराधना, उरकण्यात येऊन जमलेल्या लोकांस लाह्या, कुरमुरे, ऊसाच्या गंडेऱ्या देण्यात येतात.


त्या दिवसापासून हिंदू लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरूवात होते. ‘वधुपिते घराबाहेर पडतात व मुलीचे लग्न जुळवण्यासाठी चपला झिजवू लागतात’ असे पूर्वी म्हणत. हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके तुळशीला महत्त्व आहे.


"तुळसीचे पान ,एक त्रैलोक्य समान | उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळसी माऊली | नाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे न लगे तीर्थाधना जाणे, | नित्य पूजने तुळशीसी योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही" ||

अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.


तुळस


आता तुळशीचे काही व्यावहारिक उपयोग पाहू. तुळसही हृदयरोग, उच्चरक्तदाब, कोलायटीस, दमा अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे. आयुर्वेदाप्रमाणे तुळस ही कफहर, थंडीतापातज्वरहर, अरुची, जंत, विष, कुष्ठ, मळमळयांचा नाश करणारी पण उष्ण आणि पित्तकारक आहे. तुळशीचीपाने दातांखाली धरल्यास रक्तयेणे थांबून हिरड्यांची सूज कमी होते. विड्याच्या म्हणजे नागवेलीच्यापानासारखे श्रीलंकेत तुळशीचे पान कात, सुपारी घालून खातात, त्याने तोंडाचे, घशाचे विकार होत नाहीत. मूत्ररोग, पुरुषांचेरोग, उष्णतेचेविकार यामध्ये तुळशीचेबी अत्यंत उपयोगी आहे. पुरुषाच्या काहीविकारात तुळशीचेमूळदेखील अत्यंत उपयुक्त आहे. तुळशीचेबी वापरताना साधारणपणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी हेपाणी गाळून टाकून हे बुळबुळीत झालेलेबी दुधात साखरेसहित मिसळून घेतल्याने उष्णतेचेविकार बरे होतात.


स्त्रियांच्याविकाराताही तुळशीचे अनेक उपयोग आहेत. गरम पाण्यात लिंबाचा रस, अथवा आल्याचा रस, मुठभर तुळशीचीपाने आणि मुठभर पुदिन्याचीपाने यासर्वांची वाफ चेहरयावर घेतल्यास चेहऱ्यावरील वांग, काळे डाग वगैरे जाण्यास मदत होते. अगदी महत्वाचे म्हणजे तुळशीच्यामूळ आणि खोडाच्या उगाळून केलेल्या लेपाच्या गंधाने लेपन कपाळावर केल्यास जेनेटिकरोग [शरीरातील गुणसूत्रांमध्ये विचित्रबदल होऊन होणारे रोग], आनुवंशिकरोग बरे होऊ शकतात. योग्य वैद्य किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास खूप उपयोग होऊ शकतो. कोठेही विश्वास हा महत्वाचा आहे.


तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असे म्हटले आहे. ग्रीक भाषेतील बेंझिलिकॉन हा तुळशीसंबंधीचा शब्द राजयोग या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्याअंगी विशिष्ट शक्ती आहे असे मानत असत.


अखेरीस एक सांगावेसेवाटते की तुळसही फक्त एक वनस्पती नसून एक संस्कृती आहे. कधी तणावात असाल, कंटाळले असालतर तुळशीचा वास घेऊन बघा...

28 views0 comments

Comments


bottom of page