top of page
श्री विनोद पंचभाई

उदक शांती म्हणजे काय?

आपल्या सर्वांना उदक शांती माहीत आहे पण त्याबद्दलची फारशी माहिती बहुतेक जणांना नसते.

उदक शांती म्हणजे काय?

ती शांती केव्हा करतात?

ती शांती केल्याने काय होते?

यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात कदाचित तुम्हालाही पडत असतील तर चला जाणुन घेऊया उदक शांती बद्दल.



harivara.com


अर्थ

उदक म्हणजे पाणी या पृथ्वी वर पाण्याशिवाय कुठल्याही गोष्टी चे शुध्दीकरण होऊ शकत नाही उदा.कपडे धुतांना, भांडी घासताना,आंघोळ करण्यासाठी पाण्याची जागा कोणी ही घेऊ शकत नाही

पाण्याला अभिमंत्रित करुन त्या पाण्याने घराचे शुद्धीकरण करणे म्हणजे उदक शांति

फायदे

नवीन घरात रहायला जायचे असल्यास आपण वास्तुशांती करून रहायला जातो पण जर मुहूर्त नसेल तर उदक शांती करून शुध्दीकरण झाल्यावर आपण रहायला जाउ शकतो.

नवीन व्यापारीक स्थान असेल ते आधी कोणी कसे वापरले हे आपणास माहिती नसते तीथे सुद्धा आपण उदक शांती करु शकतो

घरी सुतक झाल्यावर त्रयोदश श्राद्ध करुन मग चौदाव्या दिवशी आपण शुद्धीकरण साठी उदकशांती करतो

उदकशांती चे अजुन महत्वाचे फायदे म्हणजे घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होउन दैविय उर्जेचे संपादन होते घरातील अशांति नाहिशी होउन प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होते




विधी

उदकशांती करताना गुरूजी गणपती पुजन व पुण्याहवाचन करतात प्रधान पीठावरील कलशास गुग्गुल ने धुपवितात मग ब्रह्म देवाला स्थापन करतात गुग्गुल चा धुर पुर्ण घरात फिरवतात वेदांचे मंत्र म्हणून पाणी अभिमंत्रित केले जाते.


उदकशांती मधे तीन प्रकारे शुद्धीकरण प्रक्रिया होते सर्वप्रथम 1)गुग्गुल चे धुर त्यानंतर 2)वेद मंत्रांची स्पंदने नंतर 3)पाण्याने सिंचन करून केले जाणारे शुद्धीकरण

यजमानांना आंघोळीला सुद्धा हे पाणी दिले जाते जेणेकरून घरातील व परिवारातील नकारात्मक शक्ती चा पुर्णपणे नाश होतो


*वैदिक कर्मकाण्डात अनेक याग, अनुष्ठान, व्रते व पुजा सांगितल्या त्यातील काही प्रचलित असल्यामुळे माहित असतात आणि काही प्रचलित नसल्याने माहिती नसतात म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आहे .अजुन खुप अनुष्ठान आहेत आपले सहकार्य व प्रेम यांच्या सहयोगाने ते ही अल्प बुद्धी ने शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करेल


उदक शान्ति पूजा कुठल्याही शुभ परिणामासाठी, वित्तीय समस्या, घर , कामावर तणाव , स्वास्थ्य या साठी केली जाते. तसेच विवाह, उपनयन, गृहप्रवेश, घरातील नवीन जन्म या सारख्या शुभ कार्यक्रमांत, घराच्या शांतीसाठी ही केली जाते.


या पूजेत १ ४ ४ १ ओळींचा पाठ ३ तास असतो. ही पूजा गणपति पूजनाने होते. या पूजेत गंगा नदीचे पवित्र पाणी एका कलशात ठेवतात आणि पवित्र परमेश्वराला त्यात निवास करण्यासाठी आमंत्रित केले जाते.


उदक शान्ति पूजेतील मंत्र अग्नि और विष्णु यांना बोलाले जाते. सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी दोन देवताना अनुरोध केला जातो ज्यामुळे सर्वांना सुखी आणि समृद्ध जीवन मिळेल.




उदकशांती


वास्तु शुद्धी/ ‘गृहशुद्धी’ हे ‘उदकशान्ती’चे मुख्य उद्दिष्ट असले तरी त्यासोबतच आरोग्यप्राप्ती व शारीरिक, मानसिक बलप्राप्ती हि सुद्धा उद्दिष्टे आहेत.


उदकशांती करण्यामागची कारणे:


🌺वास्तुशान्तीचे मुहूर्त नसताना गृहप्रवेश करून राहायला जाणे अत्यावश्यक असल्यास उदकशांती करतात. ( हा तत्कालीन उपाय आहे; याने वास्तुशान्तीचे फळ मिळणार नाही पण वास्तुमुहुर्त मिळेपर्यंत घरात वास्तव्य व अन्नभक्षणादि दोष लागणार नाहीत. पुढे लाभणाऱ्या वास्तुमुहुर्तावर वास्तुशांती करणे मात्र आवश्यक आहे.)


🌺घरातील व्यक्ती निधन पावल्यानंतर तेरावा ,चौदावा विधी केल्यानंतर ग्रहशुद्धीसाठी उदकशांती करतात.


🌺चारधामपैकी एखादी यात्रा करून आल्यानंतर घरी गंगापूजन असते तेव्हा उदकशांती करतात.

🌺कालसर्प शांती केल्यानंतर उदक शांती करावी लागते. कारण त्याशिवाय कालसर्प शांतीचे फळ मिळत नाही.

🌺आपण राहत असलेली वास्तु तसेच आपले व्यवसायाचे ठिकाण येथील वास्तूतील नकारात्मक ऊर्जेचा नाश होण्यासाठी व वास्तूत सकारात्मक ऊर्जा वास करण्यासाठी यजमानांनी दर वर्षी उदक शांती करावी.

🌺विधी :

यजमानांना पंचगव्य देउन शरीरशुद्धी केली जाते. त्यानंतर आपली कुलदेवता, ग्रामदेवता, सद्गुरू, वास्तुदेवता, आपण ज्या ठिकाणी राहत असतो त्या परिसरातिल देवता या सर्वांना नारळ-विडा ठेवला जातो. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन येणे अशक्य असल्याने घरातच देवांसमोर हे नारळ-विडे ठेवले जातात. त्यांना नमस्कार करून, घरातील सर्व वडिलधार्‍या मंडळींना नमस्कार करून, आलेले गुरूजी यांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरूवात होते.

🌺पंचांग पठण :काही मंगल श्लोकांचे पठण करून तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या सर्वांचा उल्लेख केला जाते.

🌺संकल्प : सर्व कुटुंबिय मंडळींना सुद्दृढ आयुष्य, आरोग्य प्राप्त होउन सर्व प्रकारची शांतता मिळावी म्हणून आजच्यादिवशी ब्राम्हणांना बोलाऊन उदकशांत करतो. असा संकल्प करतात. संकल्प करून झाल्यावर सर्व कार्य निर्विघ्नतेने संपन्न होण्यासाठी गणेश पूजन करतात.सुपारीवर किंवा नारळावर गणेशपूजन केले जाते.

🌺 पुण्याहवाचन : आलेल्या गुरुजींकडून हा दिवस आम्हाला पुण्यकारक, ऋद्धिकारक, श्रीकारक व कल्याणकारक असो असे आशीर्वाद दिले जातात. नंतर आलेल्या गुरुजींची उदकशांतीसाठी नियुक्ती केली जाते. त्याला आचार्यवरण असे म्हणतात. येथपर्यंतचाविधी यजमानांकडून केला जातो. व पुढचेकार्य प्रामुख्याने गुरूजी करतात. पिवळीमोहरी, पंचगव्य व शुद्धपाणी घरात प्रोक्षण करून गृहशुद्धी केली जाते. नंतर मुख्य कार्यास प्रारंभ होतो.सिकता म्हणजे वाळू , वाळूचे स्थंडिल(ओटा) घालून त्यावर दूर्वा, दर्भ घालून त्यावर फ़ुले व फ़ळे ठेवतात. चार बाजुला विशिष्ट संख्येने दर्भाची परिस्तरणे घालतात. उदकशांतिच्यावेळी कोळश्यांवर धूप/ऊद घालून त्या धुराने कलश किंवा कळशी धुपवतात. त्यामधे शुद्धपाणी भरून षडंगसहित वेदपुरूष ब्रह्मदेवतेचे आवाहन करतात. त्याच कलशात ब्रह्मदेवाची षोडशोपचार पंचामृती पुजा करतात.


🌺पाणी व ब्रह्म यातिल साधर्म्य :


वेदांमध्ये “आपोवैदेवानां प्रियं धाम” म्हणजे पाणी हे देवतांचे आवडते स्थान आहे. “आप:सर्वस्य भेषजी:” म्हणजे पाणी सर्व रोगांवर औषध आहे. अशा अर्थाची वचने आढळतात. त्या आधाराने पाणी व ब्रह्म यांना एकरूप मानले आहे. ब्रह्म ज्याप्रमाणे मुळचे निराकार परंतु ज्याचा आश्रय घेईल तसा त्याचा आकार धारण करते. त्याप्रमाणे पाणीसुद्धा मुळचे निराकार व ज्या पात्रात जाईल त्याच्या आकारानुसार स्वत:चा आकार बनवते. म्हणून कळशी/कलश धुपवून त्यात समंत्रक पाणी भरले जाते. या पाण्यातच ब्रह्मदेवतेचे पूजन केले जाते. विष्णू, शंकराप्रमाणे ब्रह्मदेवतेचे पूजन मुर्तीच्या रुपात न होता पाणी अथवा दर्भाच्या माध्यमातूनच होते. षोडशोपचार पूजा झाल्यावर दूर्वा व दर्भ यांनी कलश/कळशी आच्छादित केली जाते. या दर्भाच्या आच्छादनास ब्रह्मा असे म्हणतात. दर्भ व ब्रह्मा हे एकदमच उत्पन्न झाले आहेत असे वचन आहे. चार दिशांना १-१ गुरूजी नियुक्त केले जातात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांच्या संहितेतला आद्य मंत्र म्हणून उदकशांतितील मुख्य मंत्र पठणास प्रारंभ होतो.


🌺पहिला भाग :यात राक्षोघ्न म्हणजे राक्षसिवृत्तीचा नाश करणारे मंत्र म्हटले जातात. द्वेष करणार्‍यांना रुद्राच्या दाढेत देतो (जबड्यात) देतो. असे पालुपत असलेल्या प्रार्थनाही येतात. चार मुख्यदिशा व त्यांचे अधिपती


🌺उदक शांती

🌺आपल्या सर्वांना उदक शांती माहीत आहे पण त्याबद्दलची फारशी माहिती बहुतेक जनांना नसते.

उदक शांती म्हणजे काय?

ती शांती केव्हा करतात?

ती शांती केल्याने काय होते?

🌺उदक म्हणजे पाणी या पृथ्वी वर पाण्याशिवाय कुठल्याही गोष्टी चे शुध्दीकरण होऊ शकत नाही उदा.कपडे धुतांना, भांडी घासताना,आंघोळ करण्यासाठी पाण्याची जागा कोणी ही घेऊ शकत नाही

🌺पाण्याला अभिमंत्रित करुन त्या पाण्याने घराचे शुद्धीकरण करणे म्हणजे उदक शांति

फायदे

🌺नवीन घरात रहायला जायचे असल्यास आपण वास्तुशांती करून रहायला जातो पण जर मुहूर्त नसेल तर उदक शांती करून शुध्दीकरण झाल्यावर आपण रहायला जाउ शकतो.

🌺नवीन व्यापारीक स्थान असेल ते आधी कोणी कसे वापरले हे आपणास माहिती नसते तीथे सुद्धा आपण उदक शांती करु शकतो

🌺घरी सुतक झाल्यावर त्रयोदश श्राद्ध करुन मग चौदाव्या दिवशी आपण शुद्धीकरण साठी उदकशांती करतो

🌺उदकशांती चे अजुन महत्वाचे फायदे म्हणजे घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होउन दैविय उर्जेचे संपादन होते घरातील अशांति नाहिशी होउन प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होते

🌺 विधी

उदकशांती करताना गुरूजी गणपती पुजन व पुण्याहवाचन करतात प्रधान पीठावरील कलशास गुग्गुल ने धुपवितात मग ब्रह्म देवाला स्थापन करतात गुग्गुल चा धुर पुर्ण घरात फिरवतात वेदांचे मंत्र म्हणून पाणी अभिमंत्रित केले जाते.


🌺उदकशांती मधे तीन प्रकारे शुद्धीकरण प्रक्रिया होते सर्वप्रथम 1)गुग्गुल चे धुर त्यानंतर 2)वेद मंत्रांची स्पंदने नंतर 3)पाण्याने सिंचन करून केले जानारे शुद्धीकरण

यजमानांना आंघोळीला सुद्धा हे पाणी दिले जाते जेणेकरून घरातील व परिवारातील नकारात्मक शक्ती चा पुर्णपणे नाश होतो


🌺वैदिक कर्मकाण्डात अनेक याग, अनुष्ठान, व्रते व पुजा सांगितल्या त्यातील काही प्रचलित असल्यामुळे माहित असतात आणि काही प्रचलित नसल्याने माहिती नसतात म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आहे .अजुन खुप अनुष्ठान आहेत आपले सहकार्य व प्रेम यांच्या सहयोगाने ते ही अल्प बुद्धी ने शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करेल


🌺उदक शान्ति पूजा कुठल्याही शुभ परिणामासाठी, वित्तीय समस्या, घर , कामावर तणाव , स्वास्थ्य या साठी केली जाते. तसेच विवाह, उपनयन, गृहप्रवेश, घरातील नवीन जन्म या सारख्या शुभ कार्यक्रमांत, घराच्या शांतीसाठी ही केली जाते.


🌺या पूजेत १ ४ ४ १ ओळींचा पाठ ३ तास असतो. ही पूजा गणपति पूजनाने होते. या पूजेत गंगा नदीचे पवित्र पाणी एका कलशात ठेवतात आणि पवित्र परमेश्वराला त्यात निवास करण्यासाठी आमंत्रित केले जाते.


🌺उदक शान्ति पूजेतील मंत्र अग्नि और विष्णु यांना बोलावले जाते. सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी दोन देवताना अनुरोध केला जातो ज्यामुळे सर्वांना सुखी आणि समृद्ध जीवन मिळेल.

🌺वास्तु शुद्धी/ ‘गृहशुद्धी’ हे ‘उदकशान्ती’चे मुख्य उद्दिष्ट असले तरी त्यासोबतच आरोग्यप्राप्ती व शारीरिक, मान

सिक बलप्राप्ती हि सुद्धा उद्दिष्टे आहेत.




29,123 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Комментарии


bottom of page