वाळकाचे लोणचे
- सौ.साधना लाठकर
- Jan 16, 2021
- 1 min read
Updated: Jan 16, 2021

साहित्य:
१ किलो वाळके
१ वाटी लाल तिखट
१/२ वाटी मोहरीची पूड
१/४ वाटी हळद
१ चमचा तळलेल्या मेथ्यांची जाडसर पूड
२ चमचे जिरे पूड
१/२ वाटी मीठ
१/४ वाटी तेल
१/२ चमचा हिंग

कृती:
वाळके स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत.
नंतर त्याची सालं काढून फोडी करून घ्याव्यात.
तेल गरम करून घ्यावे व त्यात हिंग घालावा.
तेल थंड झाल्यानंतर त्यात तिखट, हळद , जिरे पूड, मीठ, मोहरीची पूड, मेथ्यांची पूड टाकावी.
तेलात सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे व नंतर त्यात फोडी घालून चांगले एकत्र करावे.
लोणचे तयार
댓글