top of page
  • श्री विनोद पंचभाई

।। वसुबारस सणाचा अर्थ ।।

वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी


वसुबारस आणि गुरुद्वादशी


आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी थोडक्यात जाणून घेऊया.


वसुबारस (गोवत्स द्वादशी)

https://www.mbs.news

श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस ! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते.


या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णूरूप पाहून जिवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरींचा लाभ उठवायचा असतो.


आश्विन वद्य द्वादशी


समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.


या व पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरीरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावे.


सण साजरा करण्याची पद्धत :

या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.


‘गोपालनाचे महत्त्व


येथे गोमातेचे महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.


वेदांनी वर्णिलेले गायीचे महत्त्व

विश्वाच्या ग्रंथालयातील सर्वांत पहिले ग्रंथ वेद आहेत. अशा वेदांनी हिंदूंच्या पाच सांस्कृतिक मानबिंदूत जननी, जन्मभूमी, गंगा आणि गायत्री यांसह ‘गोमाते’ला अनन्यसाधारण स्थान दिले आहे. गोमातेविषयी वेदात पुढील उल्लेख आढळतात.


गोस्तु मात्रा न विद्यते ।


अर्थ

गायीच्या माध्यमातून होणार्‍या लाभांची इतर कोणत्याही पशूशी तुलना होऊ शकत नाही.


गायीमुळे होणारी पंचमहाभूतांची पर्यायाने पर्यावरणाची शुद्धी !

‘त्वंमातासर्वदेवानाम् ।’ अर्थात ‘गाय ही सर्व देवतांची माता आहे’, असे म्हटले जाते. परमपित्याने सृष्टीच्या उत्पत्तीकाळात मनुष्याच्या हितासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच तत्त्वरूपी देवतांची निर्मिती केली. गाय या पंचतत्त्वांची माता आहे; कारण गोमाता भूमी, पाणी आणि वायू यांची पुढीलप्रकारे शुद्धी करते.


पृथ्वी

गोमय (शेण) आणि गोमूत्र हे भूमातेचे स्वाभाविक अन्न आहे. हे अन्न भूमातेला योग्य प्रमाणात मिळाले, तर भूमीही आरोग्यदायी होऊन पुष्कळ प्रमाणात अन्नाचे उत्पादन करील. आज केवळ रासायनिक निक्षेप (शिल्लक राहिलेले अवशेष) आणि कीटकनाशके यांमुळे अन्न, पाणी अन् वायू यांमध्ये प्रदूषण होत आहे. गोमय आणि गोमूत्र यांमध्ये कीटक प्रतिबंधक गुण असतात; मात्र ते मानव, पशू, पक्षी, कीटक-पतंग आणि पर्यावरण यांसाठी बाधक नाहीत. गोमयाच्या साहाय्याने कोणत्याही प्रकारच्या कचर्‍यापासून ‘कंपोस्ट’ पद्धतीने उत्तम खत बनवले जाऊ शकते.


आप

गोमय आणि गोमूत्र भूमीवरील पाणी अन् पावसाचे पाणी यांची शुद्धी करते. गोमयामुळे जलाशयासारख्या पाण्याच्या मोठ्या स्रोतांचे स्थलांतर रोखले जाऊन त्याची शुद्धी होत असते.


तेज

गायीचे तूप हवनाच्या माध्यमातून अग्नीरूपी देवतेच्या मुखामध्ये प्रवेश करून तेजतत्त्वाची शुद्धी करण्यासह आकाशादी सर्व देवतांची तृप्ती करते.


वायू

दिवसेंदिवस होणारी जागतिक तापमानाची वृद्धी आणि कार्बनचे उत्सर्जन यांवर नियंत्रण केवळ गोमय अन् त्यापासून निर्माण होणारे इंधन यांचा वापर केल्यानेच होऊ शकेल.


आकाश

आज प्रदूषणामुळे मानवाला रासायनिक पाऊस, अतीवृष्टी आणि अनावृष्टी, यांसारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होतेच; पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते. जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवर (होमोथेरपी) भर दिला जात आहे.


पंचमहाभूतनिर्मित मनुष्याच्या शरीराला होणारे गायीचे लाभ !


गोमूत्र

हे पावित्र्य निर्माण करणारे आहे. गोमूत्र काही रोगांना सरळ नष्ट करते, तर काही रोगांना शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून नष्ट करते.


गायीचे दूध

हे बुद्धीवर्धक, चापल्यवर्धक (स्फूर्तीदायी), रोगप्रतिबंधक आणि शरिराचे पोषण करण्यास संवर्धक आहे.


गायीचे तूप, ताक आणि पंचगव्य

हे सर्व पदार्थ गायीच्या माध्यमातून मानवाला मिळालेला ईश्वरनिर्मित उत्तम आहार आहेत.


गायीचे लाभ ओळखून सर्वांनी तिच्या

पालन करणे, ही काळाची आवश्यकता !

रक्षामि धेनुं नित्यं पालयामि धेनुं सदा ।


ध्यायामिधेनुं सम्यक् वन्दे धेनुमातरम् ।।


अर्थ : आम्ही गोमातेचे नेहमी रक्षण करू. आम्ही नेहमी गोपालन करू. तसेच गोरक्षण, गोसंवर्धन आणि गोपालन यांविषयी सतत चिंतन करू. हे गोमाते, तुझ्या वंदनीय स्वरूपाला जनमानसांत पुन्हा प्रस्थापित करू

।। गोमाता स्तुती ।।

.

नमो देव्यै महा देव्यै, सुरभ्यैच नमो नम:

गवाम बीजा स्वरूपाय, नमस्ते जगदंबिके || १ ||

.

नमो राधा प्रीयायैच, फद्ममस्यै नमो नम:

नमो कृष्ण प्रीयायैच, गवाम मात्रे नमो नम: || २ ||

.

कल्पवृक्ष स्वरुपायै, सर्वेषां सततं परे

क्षीरदायै, धनदायै, बुद्धीदायै नमो नम: || ३ ||

.

शुभायै शुभदारायै, गोप्रदायै नमो नम:

य़शोदायै किर्तिदायै, धर्मदायै नमो नम: || ४ ||

.

स्तोत्र श्रवण मात्रेन, दुष्ट, हृष्ट जगत्प्रसू,

महेन्द्राय वरम ध्यात्वा, गोलोकं साययौ पुन: || ५ ||


यया सर्वमिदं व्याप्तं जगत् स्थावरजङ्गमम्। तां धेनुं शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम्॥


अनुवाद = जिसने समस्त चराचर जगत् को व्याप्त कर रखा है, उस भूत और भविष्य की जननी गौ माता को मैं मस्तक झुका कर प्रणाम करता हूं॥


घृतनद्यो घृतावर्तास्ता मे सन्तु सदा गृहे॥ घृतं मे हृदये नित्यं घृतं नाभ्यां प्रतिष्ठितम्। घृतं सर्वेषु गात्रेषु घृतं मे मनसि स्थितम्॥ गावो ममाग्रतो नित्यं गावः पृष्ठत एव च।

लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता।

घृतं वहति यज्ञार्थ मम पापं व्यपोहतु।।घृतक्षीरप्रदा गावो घृतयोन्यो घृतोद्भवाः।घृतनद्यो घृतावर्तास्ता मे सन्तु सदा गृहे॥घृतं मे हृदये नित्यं घृतं नाभ्यां प्रतिष्ठितम्।घृतं सर्वेषु गात्रेषु घृतं मे मनसि स्थितम्॥

गावो ममाग्रतो नित्यं गावः पृष्ठत एव च। गावो मे सर्वतश्चैव गवां मध्ये वसाम्यहम्॥ सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातरः। गावो मामुपतिष्ठन्तामिति नित्यं प्रकीर्तयेत्॥


यया सर्वमिदं व्याप्तं जगत् स्थावरजङ्गमम्। तां धेनुं शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम्॥

सर्वकामदुधे देवि सर्वतीर्थीभिषेचिनि। पावने सुरभि श्रेष्ठे देवि तुभ्यं नमोस्तुते ॥

43 views0 comments

Comments


bottom of page