गव्हाच्या दलियाची खीर
- सौ. ज्योती गिरधारी
- Dec 28, 2020
- 1 min read
साहित्य:
२५० ग्रॅम गव्हाचा दलिया
२५० ग्रॅम गूळ
१२५ ग्रॅम ओल्या नारळाचा किस
४\५ काजू व बदामाचे काप
२ चमचे तूप
४\५ वेलची पावडर
अर्धा लिटर दूध

कृती :
प्रथम दलिया तूप टाकून भाजून घ्यावा.
नंतर कुकर मध्ये पाणी टाकून तीन चार शिट्या करून शिजवून घ्यावा.
दलिया गार झाल्यावर त्यात गूळ आणि ओल्या नारळाचा किस घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत एका कढईत शिजवून घ्यावे.
नंतर त्यात काजू, बदामाचे काप व वेलची पावडर टाकावी.
कढईतील मिश्रण गार झाल्यावर त्यात दूध घालावे.
स्वादिष्ट खीर खाण्यासाठी तयार
टिप: दलिया पूर्णपणे गार झाल्यावर त्यात दूध घालावे,नाहीतर दूध नासते.
Commentaires