माणसाला हवा सदा आनंद,
पण देवाला देतो काही सेकंद.
विषयांमध्ये जातो गढून,
देवाची आठवण अधून-मधून.
प्रपंच करतो आवडीने,
परमार्थ मात्र सवडीने
नाही पूजा नाही ध्यान,
मोबाईलशी अनुसंधान.
नामस्मरण boring फार
त्याने काय होणार यार??
देवाने करावी कृपा खास
गप्पा मारतो तासंतास.
जप करतो माळेवर
पण खरे प्रेम पैशावर.
खिचडीसाठी करतो उपास,
भक्तीमध्ये पूर्ण नापास.
स्वतःच्या पानात वाटयांची दाटी,
नैवेद्याला छोटी वाटी.
संकट आल्यावर देव आठवतो,
नवस बोलून deal करतो.
अभिषेक मोठ्या थाटात करतो,
return वरती डोळा असतो.
सर्व करतो स्वतःसाठी,
पण देव हवा सदा पाठी.
देवाकडं सारख मागणं,
माणसा तुझं काय हे वागणं ??
शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे, विद्या दे
नोकरी दे, घर दे, बायको दे, मुलं दे
सुख दे, समाधान दे, यश दे, कीर्ती दे
आणि हे सारं कायम टिकू दे,
असाही देवा वर दे !
हसून देव म्हणतो,
माणसा थकलो तुला देऊन सारखा
मागण्या मागतोस फारच मस्त,
पण एवढा मी नाही स्वस्त.
मागून मागून थकत नाहीस
थँक्यू सुद्धा म्हणत नाहीस !
भक्तीमध्ये करतोस लबाडी,
अरे चाललीये कुठे तुझी गाडी.
एवढं सगळं द्यायचं म्हणतोस,
पण माझ्यासाठी काय करतोस??
थोडीफार आठवण काढून,
मलाच तुझी सेवा सांगतोस..!
अरे एकदा तरी म्हण राजा,
देवा मला भक्ती दे.
🙏🙏🙏
मनी तुझे प्रेम दे
पायी तुझ्या मुक्ती दे.
तुझे गीत गाण्यासाठी
कंठामध्ये सूर दे
तुझे रूप बघण्यासाठी
डोळ्यांमध्ये भूक दे
तुझा महिमा ऐकण्याची
कानांना या आस दे
तुझे नाम घेण्यासाठी
माझा प्रत्येक श्वास दे. .!
सुटो माझी आसक्ती,
लाभो मला विरक्ती.
अंतकाळ साधण्याइतके
नामामध्ये प्रेम दे
अंतकाळ साधण्याइतके
नामामध्ये प्रेम दे.
Comments