पौष्टिक असे सातूचे पीठ कसे बनवावे
- सौ. ज्योती गिरिधारी
- Dec 21, 2020
- 1 min read
सातूचे पीठ
साहित्य :
२ वाट्या गहू
१ वाटी दाळव
७ ते ८ वेलची (विलायची)

कृती :
सर्वप्रथम गहू चांगले भाजून घ्यावेत. दाळव भाजायची गरज नाही पण नरम असतील तर थोडे गरम कढईत परतून घ्यावे. भाजलेले जिन्नस थंड झाल्यावर विलायची टाकून एकत्र मिक्सरवर पीठ करून घ्यावे. हे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे.
हे सातूचे पीठ दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये गूळ टाकून खावे.

Comentários