top of page
  • सौ.श्वेता गिरधारी- देशपांडे

हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी

साहित्य :


हरभऱ्याची कोवळी पाने (भाजी) - २ वाटी

भाजलेले बेसन - ३ चमचे

शेंगदाण्याचा कुट -४ चमचे

७\८ हिरव्या मिरच्या व ८\१० लसुण पाकळ्यांची पेस्ट

तेल - 3चमचे

मीठ चवीनुसार

पाणी- १ ग्लास




कृती :


  • प्रथम हरभऱ्याची कोवळी पाने (भाजी) थोडे पाणी घालून मिक्सरमधून फिरवून बारीक पेस्ट करून घ्यावी.

  • गॅसवर कढईत तेल गरम करून घ्यावे व त्यात लसूण मिरचीची पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे.

  • त्यानंतर त्यात मिक्सरमधे फिरवून घेतलेली भाजीची पेस्ट टाकून थोडे पाणी घालावे.

  • भाजी छान परतून घेतल्यावर त्यात भाजलेले बेसन व शेंगदाणे कूट घालावा आणि भाजी छान शिजवून घ्यावी.

  • सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालावे.

  • भाजी चांगली शिजली की गॅस बंद करावा.

  • गरम भाजी खाण्यासाठी तयार आहे.


टिप - ही भाजी करताना बेसन हे भाजूनच घ्यावे कारण यामुळे भाजीचा हिरवा रंग कायम राहतो.

Recent Posts

See All

Comentários


bottom of page